Rajasthan Viral Video  Saam Tv
देश विदेश

Viral Video: संतापजनक! शिक्षिकेने विद्यार्थ्यांकडून करून घेतला बॉडी मसाज, VIDEO पाहून राग होईल अनावर

Rajasthan School Teacher Viral Video: शाळेमध्येच शिक्षिकेने दोन विद्यार्थ्यांकडून बॉडी मसाज करून घेतल्याची धक्कादायक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

राजस्थानच्या जयपूरमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. जयपूरमधील एका सरकारी शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थ्यांकडून तिच्या पायाची मालिश करून घेतली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतप्त झाले आहेत. त्याचसोबत शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हा व्हिडीओ पाहून तुमच्या देखील रागाचा पारा चढेल.

व्हायरल होणारा हा व्हिडिओ करतारपूर येथील सरकारी उच्च प्राथमिक शाळेतील असल्याची माहिती समोर आली आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, शिक्षिका वर्गात जमिनीवर उलटी झोपली आहे. एक विद्यार्थी शिक्षिकेच्या पायावर उभे राहून तिला मालिश करून देत आहे. तर दुसरा विद्यार्थी तिथेच उभं राहून हा विद्यार्थी पडू नये यासाठी त्याला आधार देताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना मोठा धक्का बसला असून ते या घटनेचा निषेध करत आहेत.

शाळेच्या मुख्याध्यापिका अंजू चौधरी यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. मात्र त्यांना या विशिष्ट घटनेबद्दल काहीही माहिती नसल्याचा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, 'शिक्षिकेची तब्येत बिघडली असावी आणि तिने मुलांना तिला मदत करण्यास सांगितले असावे. मात्र, या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल.' या घटनेनंतर शिक्षण विभाग आणि शाळा प्रशासनावर प्रश्न उपस्थित होत आहेत. याप्रकरणी कठोर कारवाई करून दोषींना सोडू नये, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा शिक्षकांची जबाबदारी आणि विद्यार्थ्यांसोबतच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, 'अशा घटनांमुळे शिक्षण व्यवस्थेतील गंभीर त्रुटी दिसून येतात.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'शिक्षकांनी मुलांशी आदराने वागले पाहिजे.' तिसऱ्या युजरने लिहिले की, 'या घटनेचा मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. शिक्षण विभागाने याप्रकरणी कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पावले उचलली पाहिजेत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Datiya Bypoll : निवडणुकीत पराभव होताच भाजपचा मोठा निर्णय; अख्खी कार्यकारिणी बरखास्त, पक्षात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

संध्याकाळी टाईमपास खायला बनवा क्रिस्पी मखाना चिवडा; रेसिपी आहे एकदम सोपी

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

SCROLL FOR NEXT