Four friends burnt alive in Rajasthan highway accident 
देश विदेश

पुन्हा अग्नितांडव! अलिशान गाडीला ट्रेलर धडकला, आगीत ४ मित्र जिवंत जळाले

Four friends burnt alive in Rajasthan highway accident ; राजस्थानमध्ये पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. बालोतरा-सिणधरी मेगा हायवेवर ट्रेलर आणि अलिशान गाडीची भीषण धडक होऊन गाडीला आग लागली. या आगीत चार मित्रांचा जिवंत जळून मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.

Namdeo Kumbhar

Rajasthan News: जैसलमेरमध्ये एसी बसला लागलेल्या आगीत २० जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच राजस्थानमध्ये आणखी एकदा भयानक घटना घडली आहे. ट्रेलर अन् अलिशान गाडीची जोरात धडक झाली. त्यानंतर अलिशान गाडीला आग लागली अन् होरपळून चार मित्रांचा मृत्यू झाला. बालोतरा-सिणधरी या मेगा हायवेवर सडा गावाजवळ ही अपघाताची घटना घडली. (Trailer hits Scorpio car in Balotra-Sindhari highway)

अतिशय वेगात अलेल्या ट्रेलरने स्कॉर्पिओला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भयानक होती दोन्ही वाहनांना आग लागली. कारमध्ये पाच मित्र प्रवास करत होते, त्यामधील चार जणांचा जिवंत जळून मृत्यू झाला. त्यांच्या आक्रोशाने परिसर हादरला होता. कारमधील एक मुलगा प्रचंड भाजला गेला असून उपचारासाठी त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात रात्री १२ वाजता झाला. ट्रेलरच्या धडकेनंतर स्कॉर्पिओ जळून खाक झाली. एक तरूण कसाबसा आतमधून उतरला, पण त्याची प्रकृती गंभीर असल्याचे जतेय. अपघाताची माहिती मिळताच गावातील लोकांनी तात्काळ धाव घेत मदत करण्यास सुरूवात केली.

धडक इतकी भयंकर होती की ट्रेलर अन् स्कॉर्पिओच्या चिंधड्या उडाल्या. समोरासमोर जोरात धडक झाल्यामुळे दोन्ही वाहनाचे फ्युल टँक फुटले अन् जोरात आग लागली. स्कॉर्पिओमध्ये अडकेल्या चार मित्रांचा आक्रोश ऐकून अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला. गावकरी घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत आगीच्या ज्वाळाने उग्र रूप धारण केले होते, त्यामुळे आत अडकलेले लोक बाहेर पडू शकले नाहीत.

स्फोटाचा आवाज ऐकून गावकरी घटनास्थळी धावले. त्यांनी ट्रक आणि स्कॉर्पिओमध्ये अडकलेल्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु आग इतक्या वेगाने पसरली की जवळ जाणे देखील कठीण झाले. पोलिस आणि अग्निशमन दलाला तात्काळ सूचना देण्यात आल्या. पण अग्निशमन दल घटनास्थळापर्यंत येण्याआधी चार जणांचा जळून मृत्यू झाला.

भयंकर अपघातानंतर जळालेली दोन्ही वाहने रस्त्यावरच होती, त्यामुळे हायवेवर सुमारे दोन किलोमीटर वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अग्निशमन दलाच्या मदतीने पोलीस आणि प्रशासनाने अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. खराब झालेले वाहने क्रेनच्या मदतीने काढून टाकण्यात आली. दोन ते तीन तासांनंतर महामार्ग वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला. अपघातात चारजण पूर्णपणे जळाले आहेत, त्यामुळे ओळख पटवणे कठीण झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली आहे. डीएनए चाचणीद्वारे मृतांची ओळख पटवली जाईल, त्यानंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपवले जातील. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अस्तंबा यात्रोत्सवावर ड्रोन कॅमेऱ्याची करडी नजर

एकेकाळी ५ हजार रूपये कमावणारी अभिनेत्री आता आहे करोडोंची मालकीण

OBC Reservation : ओबीसी समाजाला मोठा धक्का! सरकारच्या ४२ टक्के आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

Govinda and Sunita Ahuja Divorce: मी खूप वेळा माफ केले, पण...; पत्नी सुनीतासोबतच्या डिव्होर्सच्या अफवांवर गोविंदाचा मोठा खुलासा

Nashik-Pune Highway ST Bus Accident: नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात बसचा अपघात

SCROLL FOR NEXT