
Donald Trump News : रशियाच्या तेल खरेदीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आश्वासन दिले आहे, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. बुधवारी, पत्रकारांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत,रशिया अन् तेल खरेदीवर मोठं भाष्य केलेय. त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र आहेत, त्यांनी रशियाची तेल खरेदी यापुढे भारत करणार नसल्याचे आश्वासन दिले आहे. (PM Modi assured me India will not be buying oil from Russia, says Trump at Oval Office briefing)
पत्रकारांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, रशियाकडून भारत यापुढे तेल खरेदी करणार नाही, "असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आश्वासन दिले. हे मॉस्कोवर जागतिक दबाव टाकण्याकडे टाकलेले मोठं पाऊल आहे." दरम्यान, भारत आणि पाकिस्तान सिजफायरवर याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी चुकीचा दावा केला होता. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यात किती तथ्य आहे, याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारताला विश्वासू व्यावसायिक व्यावसायिक मानतात का? असा सवाल डोनाल्ड ट्रम्प यांना एएनआय या न्यूज एजन्सीकडून विचारण्यात आला होता. यावर 'हो नक्कीच' असे उत्तर देत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र आहेत. आमच्यामध्ये चांगले संबंध आहेत. भारत रशियाकडून तेल खरेदी करत होता, त्यावर मी नाराज होो. पण आता भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, असे अश्वासन देण्यात आले आहे. आता चीनकडूनही आपल्याला हेच करावे लागेल.
भारत रशियाकडून तेल खरेदी करणं बंद करणार असल्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यात किती तथ्य आहे, हे येणारा काळच सांगेल. कारण, डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीही भारताबद्दल अनेक खोटे दावे केलेले आहेत. भारत आणि पाकिस्तान युद्ध मी थांबवले होते, असा खोटा दावा याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा केला आहे. पण पाकिस्तानच्या विनंतीनंतर युद्धबंदी केल्याचं भारताने याआधीच स्पष्ट केले होते. दुसरीकडे रशियाच्या तेल खरेदीवर भारताने याआधीच आपली भूमिका स्पष्ट केली होती. कोणत्याही दबावाखाली निर्णय घेणार नसल्याचे भारताकडून स्पष्ट करण्यात आले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.