अहिल्या नगर शहराचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरू केली आहे. हिंदूनी हिंदूंच्याच दुकानातून खरेदी करावी हे वक्तव्य ताजे असतानाच त्यांनी पुन्हा एकदा मुस्लिम समुदायाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने अजित पवार नाराज झाले. फणा काढणाऱ्या हिरव्या सापांना ठेचण्याची वेळ आली, असे वक्तव्य संग्राम जगताप यांनी केले होते. अजित पवारांकडून या वक्तव्याबाबत संग्राम जगताप यांचे कान टोचले. मुंबईतील वरळी डोम येथे झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात अजित पवार यांनी संग्राम जगताप यांच्या वक्तव्याचे वाभाडे काढले. सार्वजनिक जीवनात आपण एखाद्या समुदायाबद्दल अथवा जाती-जमाती बद्दल काय बोलतो, याच भान सर्वांनी ठेवण आवश्यक असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरळीतील डोममध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची बैठक आयोजित करण्यात आली. यात पक्षाचे सर्व नेते , मंत्री , खासदार , आमदार, जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. या बैठकीत येत्या निवडणुकीच्या तयारीसाठी अजित पवार यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. नेते , पदाधिकारी यांनी सार्वजनिक वक्तव्ये करताना भान बाळगावे, असा सल्ला अजित पवारांनी नेत्यांना अन् कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना दिला.
येत्या काही काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत, त्यासाठीची तयारी आपण सर्वजण आपआपल्या पातळीवर करीत आहोत. शेती- शिवरातल्या लोकांच्या समस्या जेव्हा जेव्हा आपण सत्तेच्या माध्यमातून सोडवल्या आहेत. २०१४ ची निवडणूक सोडली तर कायम आपल्या पक्षाचा जनाधार कायम राहीला आहे. आणि सर्व निवडणुकीत आपल्याला यश मिळाल आहे, आपण नवीन भूमिका घेऊन देखील गेल्या निवडणुकीत एका विश्वासाने लोकांनी आपल्या हातात सत्ता दिली आहे याच भान आपण सर्वांनी बाळगायला हवं, असे अजित पवार म्हणाले.
निवडणुकीत एखाद्या समुदायाने मत दिली नाहीत, म्हणून जर आपण पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात भूमिका घेत असू तर ते योग्य नाही , यांची पक्ष दखल घेत आहे यांची सर्वांना जाणीव असू द्या. प्रत्येक निवडणुकीत एखादा समाज घटक आपल्या सोबतच राहतो अस नसतं, एका निवडणुकीत त्यांनी मते दिली नाहीत म्हणजे ते आपले शत्रू झालेत असा त्याचा अर्थ होत नाही यांच भान असू द्या, असे अजित पवार म्हणाले. राज्यात सध्या सामाजिक पातळीवर अनेक घटना घडत आहेत, अश्या वेळी सार्वजनिक जीवनात आपण एखाद्या समुदायाबद्दल अथवा जाती – जमाती बद्दल काय बोलतो आहोत त्यांचे काय परिणाम गांव -खेड्यात उमटू शकतात यांची जाणीव सर्वच जबाबदार नेत्यांनी ठेवण आजच्या काळात गरजेच आहे, असेही ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.