Rajasthan Election Results Saam Tv
देश विदेश

Rajsthan Election: काय आहे कन्हैयालाल हत्याकांड प्रकरण? काय आहे त्या जागांचा निकाल?

Rajasthan Election Results : राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये भाजपने काँग्रेसवर थेट हल्लाबोल केला होता. या निवडणूक प्रचारात भाजपने उदयपूर येथील कैन्हयालाल हत्या प्रकरण बाहेर काढलं होतं. त्यानंतर येथील वातावरण खूप तापलं होतं. परंतु हा हत्याकांड जेथे घडला तेथील जागांवर काय निकाल लागला हे जाणून घेऊ.

Bharat Jadhav

Rajasthan Election kanhaiya Lal Murder Case :

राजस्थानमध्ये भाजपने कमबॅक केलं आहे. येथे १९९ जागांसाठी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने साधरण १०९ जागांवर आघाडी घेतलीय. तर ७१ जागांवर काँग्रेसची आघाडी आहे. दरम्यान काँग्रेसची सत्ता असतानाही भाजपने विजय कसा मिळवला. कोणत्या विषय महत्त्वाचे राहिले. प्रचारात कोणत्या मुद्द्यांची चर्चा मतदारांमध्ये राहिली याच्या चर्चा आता सुरू आहेत. आरोप-प्रत्यारोपाच्या प्रचार केलेल्या जागांवर काय निकाल लागला याचीही चर्चा होत आहे. (Latest News)

राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये भाजपने काँग्रेसवर थेट हल्लाबोल केला होता. या निवडणूक प्रचारात भाजपने उदयपूर येथील कैन्हयालाल हत्या प्रकरण बाहेर काढलं होतं. त्यानंतर येथील वातावरण खूप तापलं होतं. परंतु हा हत्याकांड जेथे घडला तेथील जागांवर काय निकाल लागला हे जाणून घेऊ.

निवडणुकीत ठरला चर्चेतील मुद्दा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या प्रचारात कैन्हयालाल हत्या प्रकरणाचा उल्लेख केला होता. अशोक गहलोत यांचे सरकार हे तुष्टीकरण करत असल्याचा आरोप भाजपने लावला होता. भाजपने या हत्याप्रकरणावरून काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता. काँग्रेस राजस्थानची परंपरेला धोक्यात आणत आहे.

हा हत्याकांड काँग्रेस सरकारवरील डाग आहे. या हत्याकांडाचा उल्लेख अमित शाह यांनी आपल्या प्रचार सभेत अनेकवेळा केला होता. प्रचारात हा मुद्दा उपस्थित केल्यामुळे राज्यात मोठी चर्चा सुरू झाली होती. काँग्रेसच्या विरोधात वातावरण तयार करण्यास या मुद्द्याने मोठी भूमिका बाजवली होती.

काय आहे तेथील स्थिती

कैन्हयालाल हत्या प्रकरण हे उदयपूर येथे झालं होतं. राजस्थानच्या उदयपूरमध्ये विधानसभेच्या ८ जागा आहेत. यात एका जागेवर काँग्रेसची आघाडी आहे, तर बाकी उरलेल्या ७ जागांवर भाजपची आघाडी आहे.

हे उमेदवार आहेत आघाडीवर

  • प्रताप लाल भील - गोगुंदा मतदारसंघ भाजप

  • बाबू लाल भील- झाडोल, भाजप

  • ताराचंद जैन- उदयपूर

  • नानालाल अहारी- खैरवाडा

  • फूल सिंह मीणा- ग्रामीण भाग भाजप

  • कृष्णगोपाल पाली- मावली भाजप

  • वल्लभनगर- उदयलाल डांगी , भाजप

  • रघुवीर मीणा-सलूंबर, काँग्रेस

काय आहे हत्या प्रकरण

मागील वर्षी जून २०२२ मध्ये उदयपूर येथे व्यस्ततम बाजार मालदास स्ट्रीटच्या भूत महल गलीमध्ये सुप्रीम टेलरचे मालक कन्हैयालाल याची हत्या करण्यात आली होती. रियाझ अत्तारी आणि घोस मोहम्मद नावाच्या लोकांनी कैन्हयालाल यांच्या दुकाना घुसून त्यांची धारदार शस्त्राने हत्या केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

Horoscope Saturday: या राशींना मिळणार दुप्पट लाभ, हनुमानजी करणार अपार कृपा! वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT