बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून वहिनीने आपल्या दिराची चाकूने वार करत निर्घृण हत्या केली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येतोय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंगेर जिल्ह्यातील अदलपुर गावातील २६ वर्षीय अभिषेक कुमारची त्याची वहिनी सोनी कुमारीने चाकूचे वार करत हत्या केली आहे. अभिषेकचे लग्न ३० मे रोजी खरगपूर परिसरातील कंचन कुमारीशी झाले होते. अभिषेक हा सहा भावांमध्ये चौथा असून, तिसरा भाऊ निवास मंडल याच्या बायकोने ही हत्या केली आहे.
विजेच्या कारणावरून केली दिराची हत्या...
अभिषेकच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अभिषेकची इतर पाच भावंडे एकत्र राहतात आणि त्यांचे घरातील विजेचे कनेक्शन हे स्वतंत्र आहे. बुधवारी (ता.२९) रोजी अभिषेकने घरातील पंखा सुरू केला, तेव्हा वहिनीने त्याच्यावर वीज चोरीचा आरोप केला. यानंतर अभिषेक आणि त्याच्या पत्नीमध्ये काही कारणावरून वाद सुरू होता. अभिषेक आपल्याला शिवीगाळ करत असल्याचे वहिनीला वाटले. दिराने शिवी दिल्याचा राग आल्याने वहिनीने चाकूने त्याच्यावर हल्ला केला. यात अभिषेक गंभीर जखमी झाला होता.
शेजाऱ्यांच्या सांगण्यावरून कुटुंबियांनी अभिषेकला नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु रूग्णालयात पोहचताच डॉक्टरांनी अभिषेकला मृत घोषित केले. रूग्णालय प्रशासनाने या घटनेची माहिती धरहरा पोलीसांना दिली असून, वहिनी घटनास्थळावरून फरार झाली आहे. या प्रकरणाची अधिकची चौकशी करून, दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.