Navi Mumbai Crime News : बांगलादेशातून हत्या करुन भारतात आलेल्या दोघांना अटक, पनवेल पाेलीसांची कामगिरी

याप्रकरणी पनवेल शहर पोलीस आता पुढील कारवाई करत आहेत.
panvel police arrests two bangladeshi
panvel police arrests two bangladeshisaam tv
Published On

- सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai News :

पनवेल शहर पोलीसांनी नोकरीच्या शोधात असलेल्या दाेघांची संशयावरुन चाैकशी केली असता हे दाेघे भारतीय नसून बांगलादेशी नागरिक असल्याची खात्री झाली. त्यानंतर त्यांची अधिक चाैकशी करुन त्यांना एका गुन्ह्यात अटक करण्यात आल्याची माहिती पनवेल शहर पाेलीसांनी दिली. (Maharashtra News)

पनवेल शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनूसार पनवेल बसस्टॅंड येथे तीन बांगलादेशी नागरिक नोकरीच्या शोधात फिरत असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली. पनवेल शहर पोलीसांनी सापळा रचत तीनही इसमांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे भारतीय असल्याचे कोणतेही पुरावे नव्हते. तसेच त्यांना पुरावे सादर करता देखील आले नाहीत.

panvel police arrests two bangladeshi
Palghar : अवकाळी पावसाचा सुक्या मासळीला फटका, मच्छीमारांची सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी

ते बांगलादेशी असल्याची खात्री झाल्याने अली शेख, रविवुल शेख आणि मेसन मुल्ला या तीनही संशयितांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात पासपोर्ट अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यांना अटक केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गुन्हयातील संशयित हे पोलीस कोठडी रिमांड मध्ये असताना तपासात बंगाली भाषेचे छायांकित कागद पोलीसांना प्राप्त झाले. यावेळी प्राप्त कागद बंगाली भाषाचे अवगत असलेल्या पोलीस मित्रांना दाखवुन त्यांच्याकडून कागदातील माहिती समजुन घेतली असता बांगलादेश मध्ये नरईल जिल्हयातील कालिया पोलीस ठाणेच्या अभिलेखावर दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल असल्याचा माहिती समाेर आली.

या गुन्हयामध्ये अली शेख आणि रविवुल शेख हे संशयीत आरोपी असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना प्राप्त झाली. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस आता पुढील कारवाई करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

panvel police arrests two bangladeshi
Shetkari Samvad Yatra: शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी किसान काँग्रेसचा 'एल्गार', ४ डिसेंबरपासून नंदुरबार ते नागपूर शेतकरी संवाद यात्रा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com