Palghar : अवकाळी पावसाचा सुक्या मासळीला फटका, मच्छीमारांची सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी

त्यामुळे मच्छीमारांची केलेली मेहनत वाया गेली आहे.
unseasonal rain hits palghar fishermen demands help from maharashtra government
unseasonal rain hits palghar fishermen demands help from maharashtra governmentsaam tv
Published On

Unseasonal Rain Hits Palghar :

गेल्या चार दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे शेतीचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने पालघर जिल्ह्यात देखील गेले दोन दिवसांपासून दमदार हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. (Maharashtra News)

पालघर जिल्ह्याच्या पश्चिम भागात हजारो मच्छीमारी बोटी असून या भागात मिळणारी लहान मच्छी यामध्ये बोंबील, मांदेली, कोळंबी, पाटा यांचा समावेश आहे. ही मच्छी येथील मच्छीमार सुकवून विकतात. मात्र ही मच्छी दांड्यांवर सुकवण्यासाठी ठेवली असतानाच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हे मासे आता कुजण्यास सुरुवात झाली आहे.

unseasonal rain hits palghar fishermen demands help from maharashtra government
Shashikant Shinde : आमदार शशिकांत शिंदेंवर अटकेची टांगती तलवार ? जाणून घ्या प्रकरण

त्यामुळे मच्छीमारांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे मच्छीमारांची केलेली मेहनत वाया गेली आहे. अवकाळीमुळे मच्छीमार आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांप्रमाणेच आता मच्छीमारांनाही सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील मच्छीमारांनी साम टीव्हीशी बाेलताना केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

unseasonal rain hits palghar fishermen demands help from maharashtra government
Sangli : सांगली जिल्हा भाजप वाहतूक सेनेच्या उपाध्यक्षांचा डेंग्यूने घेतला बळी, नागरिकांचा महापालिकेवर राेष

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com