Jalgaon Crime News Saam tv
देश विदेश

Rajasthan Crime News : धक्कादायक! ११ वर्षीय दिव्यांग मुलीला अत्याचार करून पेटवलं, परिसरात खळबळ

Rajasthan Crime News in marathi :राजस्थानच्या करौलीमध्ये ११ वर्षीय दिव्यांग मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी पीडित मुलीला अत्याचारानंतर पेटवून दिलं.

Vishal Gangurde

राजस्थान : राजस्थानच्या करौलीमध्ये ११ वर्षीय दिव्यांग मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी पीडित मुलीला अत्याचारानंतर पेटवून दिलं. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करण्यायासाठी ठोस पावले उचलले नसल्याचे सांगत पीडित मुलीच्या वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत.

'इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार, राजस्थानमध्ये ९ मे रोजी या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. तसेच या पीडित मुलीला पेटवून दिलं होतं. त्यानंतर या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, ११ दिवसांच्या उपचारानंतर मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. या पीडित मुलीचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे. तसेच आतापर्यंत ११-१५ जणांची चौकशी देखील करण्यात आली आहे.

पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, मुलीच्या आईने सांगितलं की, मुलगी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास खेळत होती. त्यानंतर तिच्या किंचाळण्याचा आवाज आला. त्यानंतर तिला शोधले. मात्र, ती घरापासून १०० मीटर दूर अंतरावर सापडली. त्यावेळी तिच्या अंगात कपडे नव्हते. त्रासाने रडत होती. ती बोलू शकत नाही. त्यामुळे तिने दोघांनी पेटवल्याचं सांगितलं. त्यानंतर ते दोघे रेल्वेच्या दिशेने पळाले'.

मुलीच्या आई-वडिलांनी सरकारी रुग्णालयात नेलं. त्यानंतर त्यांना जयपूरमधील रुग्णालयात जाण्यास सांगितलं. या प्रकरणी आता आयपीसी कलम ३०७ आणि ३४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी म्हटलं की, 'आमची एकच मागणी आहे की, आरोपींना अटक करावी. तसेच त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी'.

' मुलीचा मृतदेह जयपूरमधील रुग्णालयात सोडायचा इच्छा होती. मी इतका रागात होतो की, आरोपीला पेटवून द्याव. मात्र, कायद्याने माझे हात बांधले गेले आहेत. मी या प्रकरणी पोलीस अधिक्षकांची देखील भेट घेतली आहे, असं त्यांनी पुढे सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chapati Side Effects: रात्री चपाती खाल्ल्याने उद्भवतात 'या' समस्या, वेळीच घ्या काळजी

Fish : बुद्धिमान आणि सुंदर असतो हा पाण्यातील मासा, ९९% लोकांना नसेल माहिती

Shivsena: '५० खोक्यांमधील आज १ खोका दिसला' संजय शिरसाटांच्या बेडवरूममधील व्हिडिओवर शिवसेनेच्या आमदाराचा हल्लाबोल

Maharashtra Live News Update : बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची शाळांची दयनीय अवस्था

Health Insurance: आता २४ तास अ‍ॅडमिड होण्याची गरज नाही; केवळ २ तास रूग्णालयात राहूनही मिळणार क्लेम

SCROLL FOR NEXT