Shreya Maskar
यंदा गणेश चतुर्थी १४ सप्टेंबर २०२६ (सोमवारी) आली आहे. सर्वत्र गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. वातावरण ढोलताशाचा गजराने मंत्रमुग्ध झाले आहे.
यंदा गणेशासाठी शुगर फ्री मोदक बनवा. हे मोदक बनवायला अगदी सोपे आहेत. डायबिटीज रुग्ण देखील याचा आनंदाने आस्वाद घेऊ शकतात.
अंजीर- खजूरचे मोदक बनवण्यासाठी खजूर, अंजीर, पिस्ता, मनुका, बदाम, किसलेले खोबरे, खसखस आणि वेलची पूड इत्यादी साहित्य लागते.
अंजीर- खजूरचे मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम मिक्सरमध्ये पिस्ते, मनुका आणि बदाम जाडसर वाटून घ्या. नंतर त्यात किसलेले खोबरे, खसखस आणि वेलची पूड घालून पुन्हा जाडसर वाटून घ्या.
सर्व साहित्य एका बाऊलमध्ये काढून चांगले मिसळा. नंतर हे मिश्रण मोदकाच्या साच्यात भरा आणि त्याचा आकार तसाच राहील याची काळजी घ्या.
अशाप्रकारे शुगर फ्री अंजीर- खजूरचे मोदक अवघ्या ५ मिनिटांत तयार झाले. गणपती बाप्पाला याचा नैवेद्य दाखवा.
डायबिटीजच्या रुग्णांनी अंजीर- खजूरचे १-२ मोदक नक्कीच खाऊ शकता. याचे प्रमाण नियंत्रणात ठेवा, जणेकरून रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणार नाही.