Shreya Maskar
गणेश चतुर्थीला काही दिवस बाकी आहेत. सणासुदीला गोडामध्ये यंदा आवर्जून भोपळ्याचा हलवा ट्राय करा. झटपट होणारी रेसिपी लिहून घ्या.
भोपळ्याचा हलवा बनवण्यासाठी भोपळा, साखर, पाणी, काजू, बदाम, तूप आणि दूध इत्यादी साहित्य लागते.
भोपळ्याचा हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम भोपळा स्वच्छ धुवून त्याच्या चकत्या करा. तसेच, त्याची साल काढून टाका. न सोललेल्या भोपळ्याचा हलवा उत्तम बनतो.
आता एका प्रेशर कुकरमध्ये १ कप पाण्यासोबत भोपळा घालून त्याला शिजवा. कुकरला १-२ शिट्ट्या होऊ द्या.
एका पॅनमध्ये तूप घालून, त्यात कापलेले काजू आणि बदाम घालून तळून घ्या. तुपात उकडलेला भोपळा घालून चांगला परता. जेव्हा भोपळ्याचा रंग पिवळ्यावरून हलका तपकिरी होतो, तेव्हा तुमचा भोपळा व्यवस्थित भाजला आहे असे समजावे.
भोपळ्यामध्ये साखर आणि १ कप दूध घालून चांगले मिसळा. आता दूध भोपळ्यात पूर्णपणे मिसळेपर्यंत ते ढवळत राहा. दूध घातल्यावरच हलवा घट्ट होतो.
जर तुम्हाला तूप कमी वाटत असेल, तर तुम्ही ते वरून घालू शकता. ते घट्ट होईपर्यंत ढवळा आणि नंतर त्यात सुकामेवा घालून ढवळा. यानंतर गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या.
जर तुम्हाला हलवा थोडा ओलसर आवडत असेल, तर आणखी दूध घालून तो थोडा ओलसर ठेवा. जर तुम्हाला घट्ट हलवा आवडत असेल, तर दूध चांगले शिजवून मग गॅस बंद करा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हलव्याचा घट्टपणा ठेवू शकता, अशाप्रकारे तुमचा भोपळ्याचा हलवा तयार होईल.