Rava Khobryache Modak Recipe : ना उकड, ना जास्त मेहनत! फक्त २ पदार्थांत बनवा गणरायाचे आवडते रवा-खोबऱ्याचे मोदक

Shreya Maskar

रवा खोबऱ्याचे मोदक

रवा खोबऱ्याचे मोदक बनवण्यासाठी रवा, तूप, दूध, खोबरे, साखर, पाणी, वेलची पूड, पिस्ता इत्यादी साहित्य लागते.

Modak of semolina coconut | pinterest

रवा

रवा खोबऱ्याचे मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम एका पातेल्यात मंद आचेवर रवा सुमारे पाच मिनिटे परतून घ्या. नंतर, वितळवलेले तूप घालून आणखी ३-४ मिनिटे परतून घ्या. मंद सुगंध येईल.

semolina | pinterest

किसलेले खोबरे

आता मिश्रणात त्यात दूध घाला. नंतर, किसलेले खोबरे घाला. सर्व एकत्र मिसळून घ्या आणि गॅस बंद करा.

Grated coconut | pinterest

साखर

पाक बनवण्यासाठी, एका वेगळ्या पातेल्यात पाणी आणि साखर ३ मिनिटे उकळून घ्या. या वेळेत एकतारी पाक तयार होईल. गॅस बंद करा आणि वेलची पूड घाला.

sugar | pinterest

साखरेचा पाक

साखरेचा पाक रव्याच्या मिश्रणात घालून एकत्र मिसळा. रव्याचे मिश्रण गॅसवर ठेवा आणि सर्व व्यवस्थित एकजीव होईपर्यंत थोडा वेळ शिजवा.

sugar syrup | pinterest

मिश्रण थंड करा

मिश्रण ४-५ मिनिटे थंड होऊ द्या. त्यानंतर, त्याचे छोटे गोळे बनवा. गोळे बनत नसल्यास, आणखी एक मिनिट शिजवा.

Cool the mixture | pinterest

पिस्ता

आता तयार मोदकाचे सारण मोदकाच्या साच्याचा टाकून सुंदर कळीदार मोदक बनवा. त्यावर कापलेला पिस्ता भुरभुरवा.

Pistachio | pinterest

गणपतीचा नैवेद्य

अशाप्रकारे गणपतीच्या नैवेद्यासाठी रवा खोबऱ्याचे मोदक तयार झाले आहेत. तोंडात टाकताच रवा खोबऱ्याचे मोदक विरघळतील.

Ganapathi's offering | pinterest

NEXT : कोकणी चवीचे गव्हाच्या पिठाचे मोदक; गौरी-गणपतीला नक्की बनवा, वाचा सोपी रेसिपी

Modak Recipe | AI PHOTO
येथे क्लिक करा...