Shreya Maskar
सोंडाई किल्ला हा ट्रेकिंगचे उत्तम ठिकाण आहे. किल्ल्याच्या शिखरावरून मोरबे धरण आणि सह्याद्री पर्वतरांगांची विहंगम दृश्ये दिसते.
पाली भुतिवली धरण रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात डिकसाळ गावाजवळ असलेले एक सुंदर पर्यटन व निसर्गरम्य ठिकाण आहे. पावसाळ्यात येथील सौंदर्य वाढते.
आदई धबधबा हा पावसाळ्यात लोकप्रिय होणारा नैसर्गिक स्पॉट आहे. आजूबाजूला हिरवाई आणि पाण्याचा प्रवाह असल्यामुळे वन-डे पिकनिकसाठी आकर्षक पर्याय ठरतो.
गवळीदेव धबधबा हा नवी मुंबईच्या आसपासचा सुंदर पिकनिक स्पॉट आहे. पावसाळ्यात परिसर हिरवागार होतो आणि धबधब्यामुळे वातावरण अधिक निसर्गरम्य दिसते
खारघरमधील पांडवकडा धबधबा हा नवी मुंबई परिसरातील प्रसिद्ध मॉन्सून स्पॉट आहे. सुमारे 107 मीटर उंचीचा हा धबधबा पावसाळ्यात हिरव्यागार डोंगरांच्या पार्श्वभूमीवर आकर्षक दिसतो.
करावे-नेरुळ परिसरातील हा निसर्गप्रेमी आणि पक्षीनिरीक्षकांसाठी खास स्पॉट आहे. हिवाळ्यात स्थलांतरित फ्लेमिंगोंमुळे हे ठिकाण विशेष आकर्षक होते.
टपालवाडी धबधबा म्हणजे परमल नदीमुळे तयार झालेली हंगामी धबधब्यांची मालिका होय. पावसाळ्यात आणि त्यानंतरच्या काळात भेट देण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. नैसर्गिक पाण्याचे डोह आणि खडकाळ परिसर पाहायला मिळतो.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.