Rajasthan bharatpur Love Affair / Social Media saam tv
देश विदेश

Crime News : पतीच्या मृतदेहाजवळ बसून खीर-पुरी खाल्ली, व्रतही केले; ६ महिन्यांनी पत्नीचं क्रूर कृत्य उघड

पतीच्या हत्या प्रकरणात पोलिसांच्या अटकेत असलेल्या महिलेने चौकशीदरम्यान हैराण करणारी माहिती दिली.

साम ब्युरो

Rajasthan Crime News : राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील चिकसाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना उघडकीस आली होती. बॉयफ्रेंडच्या मदतीने पत्नीने तिच्या पतीची निर्घृणपणे हत्या केली. या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पतीच्या हत्या प्रकरणात पोलिसांच्या अटकेत असलेल्या महिलेने चौकशीदरम्यान हैराण करणारी माहिती दिली.

२९ मे २०२२ रोजी रिमाने आपला प्रियकर भागेंद्रच्या साथीने पती पवनची निर्घृण हत्या केली. त्यानंतर पतीचा मृतदेह तिनं बेडवरच ठेवला. किचनमध्ये जाऊन तिनं खीर-पुरी बनवली. त्यानंतर पतीच्या मृतदेहाजवळ तिनं आणि तिच्या बॉयफ्रेंडनं बसून खीर-पुरी खाल्ली. त्यानंतर त्याच रात्री दोघांनीही त्याचा मृतदेह जवळच्याच एका नाल्यात फेकला. (Latest Marathi News)

रिमाने आपल्या पतीची हत्या सहा महिन्यांपूर्वीच केली होती. इतके दिवस ती पोलिसांची दिशाभूल करत होती. मृताच्या वडिलांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवल्यानंतर ही घटना उघड झाली. दुसरीकडे, पतीच्या वडिलांनी रिमाला तिच्या बॉयफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडले. त्यानंतर संशय अधिक बळावला. त्याने सून आणि तिच्या प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली. (Crime News

सहा महिन्यांपूर्वीच बेपत्ता झालेल्या पवनचा शोध पोलीस घेत होते. त्याचवेळी पत्नी रिमा आणि तिच्या प्रियकराची चौकशी सुरू होती. रिमानं केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. प्रियकराच्या साथीने पतीची हत्या करून नाल्यात फेकून दिल्याचं तिनं सांगितलं. पोलीस आरोपींना घटनास्थळी घेऊन गेले. तेथे मृताची पँट, आधार कार्ड आणि काही हाडे ताब्यात घेतली.

पोलिसांच्या माहितीनुसार, रिमाने पतीची हत्या मे २०२२ रोजी केली. त्यानंतर ४ जून २०२२ रोजी पवनच्या वडिलांनी चिकसाना पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी पवनचा शोध सुरू केला. मात्र, काही ठोस माहिती हाती लागू शकली नव्हती. त्याचवेळी त्याची पत्नी प्रियकराला भेटू लागली. दुसरीकडे पवनचा शोध त्याचे कुटुंबीय आणि पोलीस घेत होते. पण त्याचा कुठेच ठावठिकाणा लागू शकला नाही.

रिमानं पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती दिली. पतीची हत्या केल्यानंतर तिनं याबाबत कुणालाही काही कळू दिले नाही. सासरच्या मंडळींसमोर जणू काही झालंच नाही असं ती दाखवू लागली. घरच्यांच्या समोर ती गळ्यात मंगळसूत्र घालायची. भांगेत कुंकू देखील लावत होती. तिनं ऑक्टोबरमध्ये आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रतही ठेवले होते, अशी माहिती तिनं दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : कपड्यांना साबणाचा वास येतोय? झटपट करा ५ घरगुती उपाय

Maharashtra Live News Update: अकोला राडा प्रकरण : पोलिसांकडून ६ जणांना अटक

Shah Rukh Khan injured: शाहरुख खान चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान गंभीर जखमी; सिनेमाच्या सेटवर नेमकं काय घडलं?

Politics: हनी ट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं, बड्या नेत्यांचा समावेश; काँग्रेसच्या नेत्यानं उघडले पत्ते

WhatsApp New Feature: व्हॉट्सअ‍ॅपवर लाँच झाले Status Ads फीचर, कसं काम करणार?

SCROLL FOR NEXT