Solapur Crime : पत्नीकडे परपुरुषानं पाहू नये म्हणून पतीचं संतापजनक कृत्य; नाभिकाला घरी बोलावलं अन्...

विचित्र प्रकार ऐकून पोलीस चक्रावले
Solapur News
Solapur NewsSaam Tv
Published On

सोलापूर - परपुरुषाने आपल्या पत्नीकडे पाहू नये यासाठी पतीने चक्क नाभिकाला बोलावून २० वर्षीय पत्नीचे टक्कल केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात (Solapur) घडली. ही बाब तीन महिन्यानंतर जेव्हा पत्नी काल जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये आली त्यावेळी उघडकीस आली. हा प्रकार पोलिसांसमोर (Police) पीडितेने मांडताच पोलीसही ऐकून थक्क झाले.

पीडित हिचा विवाह जोडबसवण्णा चौकातील कलीम चौधरी या तरुणाशी मे महिन्यात झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनीच पतीने पत्नीवर संशय घेण्यास सुरुवात केली. सासरकडील मंडळी हार बनवण्याचा व्यवसाय करत असून सगळेजण तिला एकटीला घरी कोंडून व्यवसायासाठी जात होते. तरीही तिच्यावर नवरा संशय घेत होता. यातूनच पतीने संशय घेत तिला तुझे केस मला आवडत नाहीत,असे म्हणत तिला केस काढून टक्कल करायचे असल्याचे सांगितले.

Solapur News
Meerut Election : मेरठ शहराचं नाव नथुराम गोडसे नगर करणार; हिंदू महासभेची मोठी घोषणा

हे ऐकताच पत्नीने साफ नकार दिला, पण त्यानंतर पतीने रागाच्या भरात तिच्याशी बोलणे बंद केले. इतकेच नाही तर जेवण न करणे मारहाण करणे अशी वागणूक सुरु केली. यामुळे पीडितीने मनावर दगड ठेवून केस कापण्यास होकार दिला. केस कापण्यासाठी नाभिक आल्यानंतरही त्यावेळी अगोदर तिने विरोध केला नंतर नाईलाजाने ती शांत राहिली, अशी माहिती पीडितेच्या आईवडिलांनी दिलीय.

दरम्यान,पीडितेच्या पतीने बाहेरून नाभिकाला बोलावून पत्नीचे केस पूर्णतः काढून टाकले. हा प्रकार पीडितेने आपल्या माहेरी सांगितला नाही. काही दिवसानंतर माहेरच्या लोकांनी कार्यक्रमानिमित्त पीडितेला व जावयाला घरी बोलावले. त्यावेळी पतीने पीडित पत्नीला घरी नेऊन सोडले. त्यावेळी पीडितेने आपल्याबरोबर झालेली घटना आई-वडिलांना सांगितली.

यानंतर तरीही पीडितेच्या आई-वडिलांनी मुलीला सासरी नांदविण्यासाठी घेऊन जातील असे वाटून याची तक्रार केली नाही, पण २२ दिवसानंतरही पतीने पीडितेच्या कुटुंबीयांचे फोन घेणे टाळले. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी गुन्हा दाखल करण्यासाठी जेलरोड पोलीस ठाणे गाठले. यावेळी पोलिसांनी पीडित महिलेची विचारपूस केली. त्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कलीम चौधरीवर याच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com