राजस्थानमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये अटीतटीची निवडणूक होणार आहे. दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस असल्यामुळे उमेदवारांच्या निवडीतच अधिक चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान भाजपने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. तर काँग्रेसने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलीय.(Latest News)
राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. दरम्यान या पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
भाजपने या यादीत ८३ उमेदवारांचे नावे जाहीर केली आहेत. भाजपने १० महिला उमेदवारांना तिकीट दिलंय. भाजपचे वरिष्ठ नेते सतीश पुनिया यांना अंबेर येथून तर कैलाश चंद वर्मा यांना बगरू येथून उमेदवारी देण्यात आलीय. तर माजी वसुंधरा राजे यांना झालरापाटन तिकीट देण्यात आलंय.
वसुंधरा यांच्या गटातील अनेक नेत्यांना उमेदवारी देण्यात आलीय. यात प्रताप सिंह सिंघवी, अशोक डोगरा, नरपत सिंह राजवी, श्रीचंद कृपलानी, कालीचरण सराफ, कैलाश वर्मा, सिद्धी कुमारी, हेम सिंह भडाना , अनिता भदेल, कैन्हया लाल, यांची नावे आज जाहीर करण्यात आलेल्या यादीत आहे.काँग्रेसने ३३ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. यात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना सरदारपूरा मधून उमेदवारी देण्यात आलीय.
तर सचिन पायलट यांना टोंकमधून उमेदवारी देण्यात आलीय. नाथद्वारा येथून सीपी जोशी, लछमनगड येथून गोविंद सिंह डेटासरा, सादुलपूर येथून कृष्णा पूनिया यांना उमेदवारी देण्यात आलीय. लाडनूं येथून भाकर यांना उमेदवारी मिळालीय.
३० आमदार उतरले मैदानात
मुख्यमंत्री अशोक गहलोतसह सचिन पायलट हे आपल्या जुन्या जागेवरून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. दरम्यान काँग्रेसने सध्या आमदार असलेल्या ३० जणांना मैदानात उतरवलंय. तर काँग्रेसने दोन आमदारांचे तिकीट कापलंय. चितौडमधून चंद्रभान सिंह आणि सांगानेरहून अशोक लाहौटी यांचे तिकीट कापण्यात आलंय. काँग्रेसने ५ मंत्र्यांना देखील तिकीट दिलंय.
काँग्रेसने कुठून कोणाला दिलं तिकीट
नोहार- अमित चौहान
कोलायत- भंवर सिंह भोटी
सुजानगड - मनोज मेघवाल
मांडवा- रिता चौधरी
विराटनगर इंद्राज सिंह गुर्जर
मालवीय नगर - अर्चना शर्मा
सांगनेर - पुष्पेंद्र भारद्वाज
मंडवार - ललित कुमार यादव
अलवर - टीकाराम जूली
जुनी सिकरई- ममता भूपेश
सवाई माधोपूर- दानिश अबरार
डीडवाना- चेतन सिंह चौधरी
जयाल- मंजू देवी
देगाना - विजयपाल मिर्धा
परबतसार - रामनिवास गावरिया
ओसिया- दिव्या मदेरणा
जोधपूर- मनीश पवार
लुनी- महेंद्र विश्नोई
बायूत- हरीष चौधरी
वल्लभनगर - प्रीति गजेंद्र सिंह शेखावत
डुंगरपूर- गणेश गोघरा
बागीडोरासे - महेंद्र जीत सिंह मालवीय
कुशलगढ- रामलीया खाडिया
प्रतापगढ - रामलाल मीणा
भीम- सुरदर्शन सिंह रावत
मंडलगड- विवेक धाकड
हिंडोली- अशोक चांदना
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.