Elections Survey: मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी आवडता नेता कोण? नवीन सर्वेक्षणात जनतेचा कौल कोणाला

Assembly Elections Survey: मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी आवडता नेता कोण? नवीन सर्वेक्षणात जनतेचा कौल कोणाला
Shivraj Singh Chouhan, Ashok Gehlot, Bhupesh Baghel
Shivraj Singh Chouhan, Ashok Gehlot, Bhupesh BaghelSaam Tv
Published On

Madhya Pradesh, Rajasthan, Chhattisgarh opinion poll:

निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या पाच राज्यांमध्ये एकूण 16 कोटीहून अधिक मतदार मतदान करणार आहेत. त्यापैकी तीन राज्य मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणुका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. मध्य प्रदेशमध्ये 17 नोव्हेंबरला, राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबरला आणि छत्तीसगडमध्ये 7 आणि 17 नोव्हेंबरला निवडणुका होणार आहेत.

अशातच नुकतेच एक नवीन सर्वेक्षण समोर आले आहे, ज्यामध्ये तिन्ही राज्यांतील जनतेला मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या आवडत्या नेत्याबाबत विचारण्यात आले आहे. सर्वेक्षणानुसार राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची जादू कायम आहे. तर मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आघाडीवर आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

Shivraj Singh Chouhan, Ashok Gehlot, Bhupesh Baghel
Rahul Gandhi Viral Video: कोण आहे राहुल गांधींची क्रश, लग्न कधी करणार? स्वतःवर बनवलेल्या मीम्सवरही दिलं उत्तर

सी व्होटरने एबीपी न्यूजसाठी हे सर्वेक्षण केले आहे. तीन राज्यातील जनतेला मुख्यमंत्री म्हणून कोणता नेता जास्त आवडतो, असा प्रश्न विचारण्यात आला. राजस्थानमधील एकूण 34 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांना गेहलोत सर्वात जास्त आवडतात. तर भाजपच्या वसुंधरा राजे यांना 22 टक्के लोकांनी आपली पसंती दर्शवली. या यादीत सचिन पायलट तिसऱ्या क्रमांकावर आहे. एकूण 18 टक्के लोकांनी त्यांना पसंती दर्शवली. (Latest Marathi News)

सर्वेक्षणानुसार, मध्य प्रदेशातील एकूण 43 टक्के लोकांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना आपली पहिली पसंती असल्याचे सांगितले. काँग्रेसचे कमलनाथ दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यांना 42 टक्के लोकांनी आपलॆ पसंती दर्शवली आहे. यातच एकूण 10 टक्के लोकांनी सांगितले की, ज्योतिरादित्य शिंदे ही त्यांची पहिली पसंती आहे.

Shivraj Singh Chouhan, Ashok Gehlot, Bhupesh Baghel
Dasara Melava: 'बाळासाहेबांनी अंगार फुलवला, तिथे वैचारिक भंगार ऐकायला कोण जाणार', दसरा मेळाव्यावरून शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल आघाडीवर आहेत. एकूण 45 टक्के लोकांनी त्यांना त्यांची पहिली पसंती असल्याचं सांगितलं आहे. बघेल यांच्यानंतर भाजपचे रमण सिंह यांना मते मिळाली आहेत. रमण सिंह यांना 25 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com