Dasara Melava: 'बाळासाहेबांनी अंगार फुलवला, तिथे वैचारिक भंगार ऐकायला कोण जाणार', दसरा मेळाव्यावरून शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

Shiv Sena Dasara Melava 2023: 'बाळासाहेबांनी अंगार फुलवला, तिथे वैचारिक भंगार ऐकायला कोण जाणार', दसरा मेळाव्यावरून शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
Eknath Shinde On Shiv Sena Dasara Melava 2023
Eknath Shinde On Shiv Sena Dasara Melava 2023Saam Tv
Published On

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray:

शिवसेनेसाठी दसरा मेळावा हा खूप प्रतिष्ठेचा मनाला जातो. या मेळव्यावात हजारो शिवसैनिक विचाराचं सोनं लुटायला येतात. यातच शिवसेनेचा दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क हे एक समीकरण बनलं आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर शिवाजी पार्कमध्ये सभा कोण घेणार यावरून ठाकरे आणि शिंदे गटात जुंपली होती. मात्र आता चित्र स्पष्ट झालं आहे. यंदा उद्धव ठाकरे हेच शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेणार आहेत. आता यावरूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भलंमोठं ट्वीट करत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की, ''आम्ही बाळासाहेबांनी पेरलेले, जपलेले विचार हृदयात घेऊन पुढे निघालोय. विचारांचा वारसा आमच्याकडेच आहे. छाती बडवून रडायला शिवाजी पार्क ही जागा नाही, जिथे बाळासाहेबांना अंगार फुलवला होता तिथे आता हा वैचारिक भंगार ऐकायला कोण जाणार?''

Eknath Shinde On Shiv Sena Dasara Melava 2023
Satara News: साताऱ्यात जलपर्यटन; तरुणांना रोजगार संधी, शिंदे सरकारचा प्लान काय?

एकनाथ शिंदे ट्वीट करून म्हणाले आहेत की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा बुलंद आवाज ज्या शिवाजी पार्कवर शिवसैनिकांनी ऐकला, ज्या मैदानातून शिवसेनाप्रमुखांनी काँग्रेसला गाडण्याचा विचार मांडला, ज्या मैदानातून प्रखर हिंदुत्वाचा जागर त्यांनी केला, त्याच मैदानातून काँग्रेसला डोक्यावर घेतले जाणार असेल तर, तो शिवसेनेचा दसरा मेळावा असूच शकत नाही. असं म्हणत त्यांनी पुन्हा एका महाविकास आघाडीवरून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे.  (Latest Marathi News)

'तर या मैदानावर सभा घेतली असती'

शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांच्या पवित्र विचारांनी भारावलेले शिवतीर्थ गेल्याच वर्षी या मंडळींनी बाटवले आहे. आम्ही ठरवले असते तर या मैदानावर सभा घेतलीही असती. परंतु, राज्याचा प्रमुख म्हणून मला कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणायची नव्हती.''

Eknath Shinde On Shiv Sena Dasara Melava 2023
Myanmar Air strike: म्यानमारमध्ये विस्थापितांवर एअर स्ट्राइक, 29 जणांचा मृत्यू

शिंदे पुढे म्हणाले की, ''बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व एवढे अस्सल आहे की, ते कुठेही सांगितले तरी त्यांचे तेज कमी होत नाही. त्या विचारांना शिवाजी पार्कची गरज नाही. आम्ही जाऊ तिथे त्यांचे विचार नेऊ. आपल्याला वारसा मिळाला असे म्हणणाऱ्यांनी आधी आरसा पाहावा म्हणजे खरे काय ते कळेल.''

ते म्हणाले, ''कोण कुठे बोलतो, यापेक्षा काय बोलतो हे महत्त्वाचे आहे. तोंड उघडले की रडगाणेच गाणार असाल तर ते कोण ऐकणार? बाळासाहेबांचा विचार त्यांनी पायदळी तुडवलाय, हे जनतेने पाहिले आहे. आम्ही बाळासाहेबांनी पेरलेले, जपलेले विचार हृदयात घेऊन पुढे निघालोय. विचारांचा वारसा आमच्याकडेच आहे. छाती बडवून रडायला शिवाजी पार्क ही जागा नाही, जिथे बाळासाहेबांना अंगार फुलवला होता तिथे आता हा वैचारिक भंगार ऐकायला कोण जाणार?''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com