Satara News: साताऱ्यात जलपर्यटन; तरुणांना रोजगार संधी, शिंदे सरकारचा प्लान काय?

Koyna Dam Tourism Development: साताऱ्यात जलपर्यटन; तरुणांना रोजगार संधी, शिंदे सरकारचा प्लान काय?
Koyna Dam Tourism Development
Koyna Dam Tourism Developmentsaam tv
Published On

Koyna Dam Tourism Development:

साताऱ्यात लवकरच जलपर्यटनाला चालना मिळणार आहे. याचबद्दल माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंद सांगितलं की, राज्यातील कोयना धरण अर्थात शिवसागरच्या बॅकवॉटर परिसरात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी शासकीय गुपिते कायदा १९२३ मध्ये अंशतः बदल केला आहे.

शिंदे म्हणाले, या सुधारणेमुळे धरण आणि आजूबाजूच्या ७ किमी पर्यंतच्या क्षेत्राला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून अबाधित ठेवून उर्वरीत जलाशयाचा ८० किमीचा परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे सातारा जिल्हा जल पर्यटनात मोठी झेप घेऊ शकेल.

Koyna Dam Tourism Development
Myanmar Air strike: म्यानमारमध्ये विस्थापितांवर एअर स्ट्राइक, 29 जणांचा मृत्यू

एकनाथ शिंदे म्हणाले की, धरण क्षेत्राच्या सुरक्षितेतला प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच आजूबाजूच्या ७ किमी पर्यंतच्या क्षेत्राला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून अबाधित ठेवले आहे. ७ किमी नंतरच्या २ किमी च्या क्षेत्राला बफर झोन म्हणून घोषित केले आहे. (Latest Marathi News)

ते म्हणाले, त्यापलीकडील जलाशयाचा विस्तीर्ण परिसर जल पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात येणार आहे. यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून जावळी तालुक्यातील मुनावळे येथे जागतिक दर्जाचे जल पर्यटन विकसित करण्याचे शासनाचे नियोजन आहे. त्यासाठी तब्बल ४७ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

शिंदे म्हणाले, ''कोयना धरण येथील जंगले सह्याद्री डोंगराच्या रांगा, निळेशार पाणी असे निसर्गाचे वरदान लाभलेले आहे. शिवसागर जलाशयात जल पर्यटन विकसित करण्यासाठी मोठी संधी आहे. या शिवसागर धरणामध्ये जल पर्यटन विकसित झाल्यास महाबळेश्वर, पांचगणी, वाई, कास पठार येथे येणारा पर्यटक शिवसागर जलाशयाकडे वळविता येईल.''

Koyna Dam Tourism Development
Ratan Tata News: पैशांची नाही, प्रेमाची श्रीमंती! अब्जाधीशांच्या यादीत लोकप्रियतेत 'रतन टाटा' अव्वल स्थानी

ते म्हणाले की, ''या माध्यमातून सातारा जिल्ह्यासाठी पर्यटकांची नवीन बाजारपेठ निर्माण होऊ शकणार आहे. त्यामुळे स्थानिक युवकांना रोजगार संधी निर्माण होईल. तसेच स्थानिक अर्थव्यवस्था विकसित होऊ शकणार आहे. या भागाचा शाश्वत आणि पर्यावरण आधारित विकासाला वेग देण्यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com