Ratan Tata News: पैशांची नाही, प्रेमाची श्रीमंती! अब्जाधीशांच्या यादीत लोकप्रियतेत 'रतन टाटा' अव्वल स्थानी

Hurun India Rich List: पैशांची नाही, प्रेमाची श्रीमंती! अब्जाधीशांच्या यादीत लोकप्रियतेत 'रतन टाटा' अव्वल स्थानी
Hurun India Rich List:
Hurun India Rich List:Saam Tv

Hurun India Rich List:

देशातील सर्वात प्रतिष्ठित उद्योगपती म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ उद्योगपती, रतन टाटा यांनी एक नवा विक्रम केला आहे. रतन टाटा यांनी आनंद महिंद्रा यांना मागे टाकत, सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो केले जाणारे भारतीय उद्योगपती बनले आहेत.

त्यांचे आता 12.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 नुसार, रतन टाटा यांचे भारतातील व्यावसायिक जगात सर्वाधिक फॉलोअर्स आहेत.

Hurun India Rich List:
Dasara Melava: 'बाळासाहेबांनी अंगार फुलवला, तिथे वैचारिक भंगार ऐकायला कोण जाणार', दसरा मेळाव्यावरून शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

दुसऱ्या क्रमांकावर आनंद महिंद्रा, 10.8 मिलियन फॉलोअर्स

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा, जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर अनेकदा मनोरंजक आणि वेगवेगळ्या स्टोरी शेअर करतात, ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. X वर आनंद महिंद्राच्या फॉलोअर्सची संख्या 10.8 मिलियन इतकी आहे. रतन टाटा यांच्या X वरील फॉलोअर्सची संख्या एका वर्षात 8 लाखांनी वाढली आहे.  (Latest Marathi News)

Hurun India Rich List:
Myanmar Air strike: म्यानमारमध्ये विस्थापितांवर एअर स्ट्राइक, 29 जणांचा मृत्यू

आचार्य बाळकृष्ण तिसऱ्या क्रमांकावर

सोशल मीडियाच्या क्रमवारीत आचार्य बालकृष्ण तिसऱ्या क्रमांकावर आहेत. बाळकृष्ण हे ग्राहकोपयोगी वस्तू कंपनी पतंजली आयुर्वेदचे अध्यक्ष आहेत. X वर त्याच्या फॉलोअर्सची संख्या 6.6 मिलियन आहे. त्याचबरोबर गुगलचे सुंदर पिचाई चौथ्या क्रमांकावर आहेत. X वर सुंदर पिचाई यांच्या फॉलोअर्सची संख्या 5.3 मिलियन आहे.

तर मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला पाचव्या क्रमांकावर आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्याचे ३ मिलियन फॉलोअर्स आहेत. तर X वर, नंदन नीलेकणी यांचे 2.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. हर्षवर्धन गोएंका यांचे 1.8 मिलियन आणि ज्येष्ठ बँकर उदय कोटक यांचे 1.1 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com