crime news saam tv
देश विदेश

सासऱ्याचं घाणेरडं कृत्य! सुनेला जबरदस्ती दारू पाजली अन् नको ते केलं; रेल्वे इंजिनिअरच्या काळ्या कृत्याने खळबळ

Kanpur Crime News : उत्तर प्रदेशातील कानपूर येथे वरिष्ठ रेल्वे अभियंत्यावर स्वतःच्या सुनेवर लैंगिक अत्याचार, हुंड्यासाठी छळ आणि धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Namdeo Kumbhar

नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातून समोर आली आहे. कानपूरमध्ये एका रेल्वे इंजिनिअरने आपल्याच सुनेला जबरदस्ती दारू पाजून तिच्यावर बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नराधम सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पीडितेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, घरात कोणी नसताना आरोपी सासऱ्याने तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेतला. तिच्यावर पाळत ठेवून सासऱ्याने हे घाणेरडं कृत्य केलं. पीडितेने या कृत्याला कडाडून विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण नराधम सासऱ्याने तिला आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. या सततच्या त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून अखेर पीडित सुनेने हिंमत करून पोलीस ठाणे गाठले आणि सासऱ्याचा खरा चेहरा जगासमोर आणला. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे.

आरोपीचे नाव मुकेश तिवारी आहे. त्याचे वय ५८ वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. सुनेवरील बलात्काराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर मुकेश तिवारी फरार होता. पण पोलिसांनी त्याला लखनौच्या आलमबाग येथील कॅरेज रिपेअर वर्कशॉपजवळ अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, तिवारी रेल्वेमध्ये वरिष्ठ विभाग अभियंता (सिनियर सेक्शन इंजिनिअर) म्हणून कार्यरत आहे. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पीडित सुनेने सांगितले की, नोव्हेंबर २०२३ मध्ये आरोपी अभियंत्याचा मुलगा अभिषेक तिवारी याच्याशी तिचे लग्न झाले होते. काही दिवस सर्व काही ठीक होते आणि त्यानंतर लगेचच हुंड्यासाठी तिचा छळ सुरू झाला. सासरच्या घरी मारहाण करण्यात आली, तिला जबरदस्तीने दारू पाजण्यात आली आणि तिचा मानसिक व शारीरिक छळ केला.

२० एप्रिल २०२४ रोजी माहेरून परत आल्यानंतर तिच्या सासऱ्याने तिला जबरदस्तीने गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले आणि तिच्यावर बलात्कार केला. तीन दिवस तिला एका खोलीत कैदेत ठेवण्यात आले आणि तिचा सतत शारीरिक छळ करण्यात आला. तिने हिंमत करून पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर तिची सुटका झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT