Summary -
दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा सुरू.
राहुल गांधी, संजय राऊत, प्रियांका गांधी यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात.
संसद भवनापासून निघालेल्या या मोर्चाला पोलिसांनी अडवले.
ताब्यात घेतल्यानंतरही इंडिया आघाडीच्या नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्या.
दिल्लीमध्ये इंडिया आघाडीने निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ३०० खासदारांनी हा मोर्चा काढला आहे. संसद भवनापासून ते निवडणूक आयोगापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. संसद भवनापासून निघालेल्या या मोर्चाला पोलिसांनी अडवले. या मोर्चादरम्यान इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांनी आणि खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. 'निवडणूक आयोग चोर आहे, मतचोरी थांबवा, लोकशाही वाचवा...', अशा घोषणाबाजी करण्यात येत आहेत.
यावेळी राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी बॅरिगेट्सवर चढून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी राहुल गांधी, संजय राऊत, प्रियांका गांधीसह अनेक खासदारांना ताब्यात घेतलं. या सर्वांना पोलिसांच्या व्हॅन आणि बसमध्ये बसवून संसद भवनामध्ये नेऊन सोडण्यात आले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर देखील नेत्यांनी आणि खासदारांनी घोषणाबाजी करणं सुरूच ठेवलं. नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.
निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहचण्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या मोर्चाला रोखले. यावेळी जोरदार गोंधळ झाला. बिहारमधील निवडणुकांसाठी विशेष सारांश सुधारणा (SIR) आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांची फसवणूक झाल्याचा आरोप करत इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आणि खासदारांनी एकत्र येत संसद भवनाताली मकर द्वाराजवळ राष्ट्रगीत गायले आणि त्यानंतर मोर्चाला सुरूवात केली. इंडिया आघाडीचे सर्व नेते आणि ३०० खासदार पायी चालत निवडणूक आयोगाच्या दिशेने निघाले होते. पण पोलिसांनी हा मोर्चा रोखला.
पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी, संजय राऊत, अखिलेश यादव आणि सागरिका घोष यांच्यासह इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांना ताब्यात घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, 'ते घाबरले आहेत. सरकार भित्रे आहे.' तर राहुल गांधी यांनी सांगितले की, बोलू शकत नाही हे सत्य आहे. कारण सत्य देशासमोर आहे. ही लढाई राजकिय नाही तर संविधान वाचवण्याची लढाई आहे. वन मॅन वन वोटची लढाई आहे. त्यामुळे आम्हाला प्युओर मतदार यादी पाहिजे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.