Rahul Gandhi speaks in the Lok Sabha during a heated debate on the Examination Bill. Saam TV Marathi
देश विदेश

Rahul Gandhi speech : "अमित शाह यांनीच गोळीबाराचा आदेश दिला," राहुल गांधींचा थेट आरोप; रिजिजू म्हणाले माफी मागा, नाहीतर...

Rahul Gandhi speech in Lok Sabha latest news : परीक्षा विधेयकावरील चर्चेदरम्यान लोकसभेत राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार टीका केली. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा गदारोळ झाला.

Namdeo Kumbhar

Examination Bill debate Lok Sabha, Parliament uproar over Rahul Gandhi remarks : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज परीक्षा विधेयकावर चर्चा सुरू असताना जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. लोकसभेत बोलताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत हल्लाबोल केला. "गृहमंत्री घाबरल्यामुळेच सभागृहात येण्याचे टाळत आहेत," असा गंभीर आरोप करत राहुल गांधी यांनी करत थेट विद्यार्थ्यांवरील कारवाईचा मुद्दा उपस्थित केला.

देशातील विद्यार्थ्यांवर झालेल्या गोळीबार आणि पेलेट गनच्या कारवाईसाठी गृहमंत्रीच जबाबदार असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. या वक्तव्यामुळे संसदेत मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले असून, दुपारी २.३० वाजता कामकाज पुन्हा सुरू होईल.

विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी परीक्षा पद्धतीवर जोरदार टीका केली. पेपर तयार करण्यापासून ते तपासण्यापर्यंतची पूर्ण प्रक्रिया बिघडल्याचा आरोप त्यांनी केला. हा परीक्षेचा पर्याय नसून पैसे उकळण्याचा (Extortion) मार्ग बनला आहे. ३० ते ४० लाखांमध्ये पेपर लीक होत असून प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, असा आरोप त्यांनी केला. खासगी कंपन्यांच्या हातात परीक्षांचे काम दिल्याने हा घोळ झाल्याचे त्यांनी म्हटले. आरएसएसने देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर ताबा मिळवला आहे. धर्मेंद्र प्रधान नावापुरते मंत्री आहेत, प्रत्यक्षात शिक्षण मंत्रालय RSS चालवत आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला.

संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधी यांचे आरोप पूर्णपणे चुकीचे आणि बिनबुडाचे असल्याचे सभागृहात सांगितले. गोळीबाराचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले असा दावा ते कोणत्या आधारावर करत आहेत? असा सवाल त्यांनी विचारला. या वादानंतर सत्ताधारी पक्षाने राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली, तर विरोधी पक्षाने गृहमंत्र्यांच्या माफीची मागणी करत घोषणाबाजी सुरू केली. यामुळे लोकसभेत मोठा गदारोळ झाला. काहीवेळासाठी कामकाज तहकूब करण्यात आले आहे.

चौकशीची मागणी करणे ठीक आहे, पण राहुल गांधींनी थेट गृहमंत्र्यांचे नाव घेऊन अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी आधाराशिवाय असा आरोप कसा केला? उद्या कोणताही खासदार उठून काहीही बोलेल... राहुल गांधींनी कोणाचा खून केलाय, असं आम्ही इथे बोलू शकतो का? त्यांना माफी मागावीच लागेल, नाहीतर त्यांनी पुराव्यांसहित बोलावे. राहुल गांधींनी माफी मागितल्याशिवाय सदन चालणार नाही, असा थेट इशारा किरेन रिजिजू यांनी दिला.

राहुल गांधी म्हणाले की, देशातील सुरक्षा दलांचा वापर हा केवळ गृहमंत्र्यांच्या आदेशानेच होतो, दुसऱ्या कोणाच्याही आदेशाने नाही, असा आरोप राहुल गांधींनी सभागृहात केला. यावर किरेन रिजिजू यांनी सरकारी आदेश दाखवण्याचे आव्हान केले. राहुल गांधी यांनी गृहमंत्र्यांनी गोळीबाराचा आदेश दिल्याचा शासकीय आदेश आणि ऑर्डर नंबर सभागृहात सादर करावा. गृहमंत्र्यांनी कोणत्या अधिकाऱ्याला गोळीबाराचे आदेश दिले, त्याचे पुरावे दाखवावेत, असे रिजिजू म्हणाले. राहुल गांधींच्या समर्थनार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहात "गृहमंत्री उत्तर द्या, उत्तर द्या" अशा जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली, ज्यामुळे लोकसभेत मोठा गदारोळ झाला.

तरुणांचा आणि विद्यार्थ्यांचा आदर झाला पाहिजे – राहुल गांधी

देशाचे भविष्य आज रस्त्यावर उतरावे लागले. आंदोलनात कोणताही राग किंवा द्वेष नव्हता, तर ती तरुणांची खरी भावना होती. भाजपमधील माझ्या मित्रांनी स्वतःच्या घरी जाऊन आपल्या मुलांना विचारावे; त्यांचे स्वतःचे मुलेही या आंदोलनाशी सहमत असतील, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.

विद्यार्थी आणि तरुण देशाचे भविष्य आहेत. विद्यार्थ्यांना हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे, त्यामुळे त्यांचा राग अगदी रास्त आहे. पण तुम्ही या तरुणांना 'इडियट' म्हणत आहात, पण संपूर्ण देशाला या विद्यार्थ्यांचा अभिमान आहे. तरुण खुले विचार आणि मोकळ्या मनाचे आहेत. जगामध्ये कसे बदल होत आहेत हे त्यांना नीट समजते. जे शिकण्यासाठी उत्सुक असतात, तेच खरे विद्यार्थी आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT