Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Surabhi Jayashree Jagdish

गुड कोलेस्ट्रॉल

भोपळ्याच्या बिया आणि त्यापासून मिळणाऱ्या तेलातील काही घटक HDL म्हणजेच गुड कोलेस्ट्रॉलच्या पातळीला मदत करू शकतात. एका अभ्यासात भोपळ्याच्या बियांचं तेल घेतलेल्या महिलांमध्ये HDL कोलेस्ट्रॉल वाढल्याचं दिसून आलंय.

Seeds for heart health | saam tv

बॅड कोलेस्ट्रॉल

भोपळ्याच्या बियांमध्ये फायबर आणि हेल्दी फॅट्स असतात. आहारातील फायबरमुळे शरीरात कोलेस्ट्रॉलचं शोषण कमी होण्यास मदत होऊ शकतं. भोपळ्याच्या बियांच्या तेलावर झालेल्या अभ्यासात LDL म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल कमी झाल्याचंही आढळलंय.

Pumpkin seeds nutrition | saam tv

रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत

भोपळ्याच्या बिया मॅग्नेशियमचा चांगला स्रोत आहेत. मॅग्नेशियम शरीरातील स्नायू आणि रक्तवाहिन्यांच्या सामान्य कामासाठी महत्त्वाचं असतं. भोपळ्याच्या बियांच्या तेलाच्या मानवी अभ्यासात डायस्टोलिक रक्तदाबात घट दिसून आलीये.

Healthy heart foods | saam tv

ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस

भोपळ्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई आणि इतर अँटीऑक्सिडंट घटक आढळतात. अँटीऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या पेशींच्या नुकसानीपासून संरक्षण करण्यास मदत करतात. त्यामुळे संतुलित आहाराचा भाग म्हणून भोपळ्याच्या बिया शरीराला अँटीऑक्सिडंट्स मिळवून देऊ शकतात.

Pumpkin seed oil | saam tv

रक्तवाहिन्यांसाठी फायदेशीर

भोपळ्याच्या बियांमध्ये असलेले फॅट्स, मॅग्नेशियम आणि वनस्पतीजन्य घटक हृदयासाठी उपयुक्त आहाराचा भाग ठरू शकतात. रक्तवाहिन्यांचं सामान्य कार्य टिकवून ठेवण्यासाठी मॅग्नेशियम आणि हेल्दी फॅट महत्त्वाचे असतात.

Pumpkin seeds and LDL | saam tv

हृदयाच्या आरोग्यासाठी पोषक

भोपळ्याच्या बियांमध्ये प्रोटीन, हेल्दी फॅट, फायबर, मॅग्नेशियम, झिंक, लोह आणि पोटॅशियम यांसारखे पोषक घटक असतात. हे घटक शरीराच्या अनेक महत्त्वाच्या कामांसाठी आवश्यक असतात. त्यामुळे भोपळ्याच्या बिया हृदयासाठी उपयुक्त पोषक आहाराचा एक भाग होऊ शकतात.

Pumpkin seeds for cholesterol | saam tv

रोज कशा खाव्यात?

रोजच्या आहारात भोपळ्याच्या बिया योग्य प्रमाणात घेता येतात आणि त्या कच्च्या किंवा हलक्या भाजून खाता येतात. शक्यतो मीठ आणि अतिरिक्त तेल न घातलेल्या बिया खा. कारण जास्त मीठ रोजच्या आहारातील सोडियमचं प्रमाण वाढवू शकते.

Pumpkin seeds for heart health | saam tv

Heart attack symptoms: 1 महिना अगोदर ही 5 लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे!

blood circulation issues | saam tv
येथे क्लिक करा