Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

Punjab Political Breaking News : पंजाबच्या काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकीआधी मोठा नेतृत्वबदल. राजा वडिंग यांच्या राजीनाम्यानंतर विजय इंदर सिंगला यांना दिली पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी.
Raja Warring resigns as Punjab Congress chief
Raja Warring resigns as Punjab Congress chief Saam tv
Published On: 
Summary
  • पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजा वडिंग यांचा राजीनामा

  • विजय इंदर सिंगला दिली पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी

  • पंजाबच्या निवडणुकांपूर्वी राजकीय घडामोडींना वेग

पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी मोठा बदल होण्याची शक्यता आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमरिंदर सिंह राजा वडिंग यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची माहितीही समोर आली आहे. दरम्यान वडिंग यांच्या राजीनाम्यानंतर विजय इंदर सिंगला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या प्रदेशाध्यक्षाच्या नावाची घोषणा झाल्यांनतर राजकारणातील घडामोडींना वेग आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजा वडिंग यांनी २०२२ मध्ये पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. आता त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आणण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याची चर्चा आहे. वडिंग हे लवकरच दिल्लीला रवाना होणार असून, पुढील एक-दोन दिवसांत त्यांची काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत भेट होण्याची शक्यता आहे.

Raja Warring resigns as Punjab Congress chief
Cancer : धूम्रपान करत नाहीत तरीही होतोय कॅन्सर, महिलांनो तुमच्या घरात दडलंय याचं उत्तर

दरम्यान, नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी विजय इंदर सिंगला यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा सुरु होती. बुधवारी रात्री त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला असून आता प्रदेशाध्यक्षपदाचा कारभार सिंगला यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला आहे. सिंगला हे या शर्यतीतील प्रमुख दावेदार मानले जात होते. त्यांच्यासोबत माजी मंत्री परगट सिंह यांच्या नावाचाही पर्याय म्हणून विचार केला जात होता.

Raja Warring resigns as Punjab Congress chief
Bribe Case : मुंबईत २ बड्या अधिकाऱ्यांना अटक, २ लाखांची लाच घेताना ACB ने रंगेहात पकडलं

याशिवाय माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि सुखजिंदर सिंह रंधावा यांच्या नावांचाही पक्षात विचार सुरू होता असल्याची माहिती आहे. मात्र अंतिम निर्णय विजय इंदर सिंगला यांच्या बाजूने लागला आहे. . पंजाब विधानसभा निवडणुकीला आता काही महिनेच शिल्लक असल्याने प्रदेशाध्यक्षपदातील हा बदल काँग्रेससाठी महत्त्वाचा मानला जात आहे. निवडणुकीपूर्वी संघटनात्मक पातळीवर नव्या नेतृत्वासह मैदानात उतरण्याची पक्षाची तयारी असल्याची चर्चा आहे.राजकीय नेत्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष आता पंजाबच्या राजकारणाकडे लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com