इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने मोर्चा काढला.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
२०० सरकारी अधिकारी विरोधकांच्या संपर्कात असल्याचा राहुल गांधींचा दावा.
ऐकलत, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी पुकारलेल्या एल्गाराला आता राहुल गांधींनी थेट शिवतांडव म्हटलयं...इतकचं काय तर इंडिया आघाडीच्या खासदारांसह राहुल गांधींनी थेट सुप्रीम कोर्टावर धडक मोर्चा काढला. त्यामुळे राहुल गांधी कधी कोणता निर्णय घेतील याचा नेम नाही. कधी राहुल गांधी थेट निवडणुक आयोगावर मोर्चा काढतात आणि पोलिसांना चकवा देऊन दिवसभर आकाशवाणी भवनातच ठिय्या मांडून बसतात.
तर कधी अचानक राजघाटावर जाऊन धरणं आंदोलन करतात. तर कधी थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर ठान मांडून बसतात. विरोधक आंदोलन कधी करतील याचा पत्ता नसला तरी विरोधकांची एकजुट रस्त्यावरच्या लढाईत वेळोवेळी दिसून येते. त्यामुळेच आता राहुल गांधींनी रस्त्यावरच्या लढाईनंतर कायदेशीर लढाई आक्रमक पवित्रा घेत काय म्हटलयं, पाहूयात. मात्र गेले काही दिवस ज्ञानेश कुमारांविरोधात ठिकठिकाणी आंदोलनं करणारे राहुल गांधींनी विरोधी पक्षाच्या खासदारांसोबत सुप्रीम कोर्टाकडे मोर्चा कसा वळवला पाहूयात.
इंडिया आघाडीच्या खासदारांनी सरन्यायाधीश सुर्यकांत यांना भेटीचं निवेदन दिलं
मात्र इंडिया आघाडीचं हे निवेदन सरन्यायाधीशांनी फेटाळून लावलं
त्याऐवजी कोर्टात दाद मागण्याच्या सूचना सरन्यायाधीशांनी विरोधकांना केली
सुप्रीम कोर्टात दुपारी 4.30 पर्यंत याचिका दाखल करा, तत्काळ सुनावणी घेऊ, असं सरन्यायाधीशांनी पत्रात लिहलं
त्यानंतर राहुल गांधींनी विरोधी खासदारांसोबत थेट सुप्रीम कोर्टाकडे मोर्चा काढून याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला.
विरोधकांनी केलेल्या भेटीच्या मागणीबाबत सरन्यायाधीशांनी काय़ म्हटलं. पाहूयात. दरम्यान सरन्यायाधीशांनी भेट नाकारल्यानंतर 'इंडिया' आघाडीने आपली रणनीती बदलत थेट सर्वोच्च न्यायालयावरच मोर्चाचा पवित्रा घेतल्यानं पोलीस यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली... राहुल गांधी, प्रियंका गांधीसह काँग्रेसचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीचे प्रमुख नेते, AISAची अध्यक्षा नेहा बोरा थेट सुप्रीम कोर्टाबाहेर पोहचले आणि त्यांच्या लीगल टीमनं कोर्टात याचिका दाखल केली. या आंदोलनात हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. व्होटचोरी आणि SIRविरोधात आणखी तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार विरोधकांनी केला.
या आंदोलनात राहुल गांधींचा पुन्हा एकदा रुद्रअवतार पाहायला मिळाला.. मात्र आता व्होट चोरी आणि SIR विरोधात दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीला स्वत: राहुल गांधी कोर्टात हजर राहून कायद्याच्या लढाईतही आघाडी घेणार का? या याचिकेवर सरन्यायाधीश सुर्यकांत काय निर्णय देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.