बेंगळुरू : काही दिवसांअगोदर टेलिव्हिजन Television आणि सोशल मीडियावर Social media भारतीय Indian क्रिकेटर राहुल द्रविड Rahul Dravid यांची एक जाहिरात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होती. ज्यात राहुल द्रविड एका ट्रॅफिक जाममध्ये अडकल्यानंतर संताप अनावर होऊन, मैं इंदिरानगर का गुंडा हूँ असे म्हणताना दिसत होता. याच इंदिरानगर भागात काल रात्रीच्या सुमारास एका आलिशान ऑडी कारचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात तामिळनाडूच्या होसूर मतदार संघातील द्रमुक पक्षाचे आमदार वाय प्रकाश यांच्या मुलाचा आणि सूनेचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. आमदार वाय प्रकाश यांनी स्वतः याची पुष्टी केली आणि सांगितले की मुलगा करुणा सागर आणि सून बिंदू यांचा मृत्यू झाला आहे.
हे देखील पहा-
या अपघातमध्ये कारमधील ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात ६ जणांनी घटनास्थळीच तर एकाचे रुग्णालयात hospital उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला आहे. रात्री उशीरा ३ तरुणी आणि ४ तरुण असे एकूण ७ जण बेंगळुरू Bangalore येथील इंदिरानगर परिसरातून सुसाट वेगाने कार चालवत जात होते. दरम्यान कारवरील नियंत्रण सुटल्याने आलिशान ऑडी कार बंगळुरू येथील इंदिरानगर परिसरात एका फुटपाथवर जाऊन जोरात आदळली.
हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये ऑडी क्यू कारचा चक्काचूर झाला आहे. या भीषण अपघात मध्ये ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये ३ मुलींसह ४ मुलांचा समावेश आहे. मृतांमध्ये १ जोडपे असल्याची माहिती समोर आली आहे. करुणा सागर आणि बिंदू असे या अपघातात मृत पावलेल्या जोडप्याचे नाव आहे.
दोघेही २३ वर्षांचे आहेत. यांच्यासोबतच केरळ येथील अक्षय गोयल, हरियाणा येथील उत्सव, हुबळी येथील रोहित आणि इशिता (वय- 21) आणि डॉ. डी जे अनुष (वय-21) असे मृत पावलेल्या ७ जणांची नावे आहेत. भीषण अपघातातनंतर यातील ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.