मुंबई - पुणे एक्सप्रेस हाईवे वर भीषण अपघात, एक प्रवासी गंभीर जखमी

एक प्रवासी गंभीर तर काहीजण किरकोळ जखमी
मुंबई - पुणे एक्सप्रेस हाईवे वर भीषण अपघात, एक प्रवासी गंभीर जखमी
मुंबई - पुणे एक्सप्रेस हाईवे वर भीषण अपघात, एक प्रवासी गंभीर जखमीविकास मिरगणे
Published On

मुंबई - पुणे एक्स्प्रेस हाईवे वर आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास पुण्याकडून Pune मुंबईकडे Mumbai जाणाऱ्या बसने पुढे जात असलेल्या ट्रेलरला मागून धडक दिली. या भीषण अपघातात Accident सर्वांचे दैव बलत्तर म्हणून एकच प्रवासी गंभीर जखमी झाला असून काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातामुळे काही काळ वाहतूक बंद होती. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात Hospital पाठवले असून अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

हे देखील पहा -

मुंबई-पुणे एक्सप्रेस हाईवे वर पुण्याकडून मुंबई कडे जाणाऱ्या लेन वर किलोमीटर 39 हे ठिकाण या हायवे वरील मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जाऊ  लागला आहे. या ठिकाणी शेकडो अपघात या दरम्यान आजतागायत झाले आहेत. तर शेकडो लोकांचा येथे मृत्यू झाला आहे. आज ही येथे भीषण अपघात झाला.

एक महाराजा ट्रॅव्हलची आराम बस सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान येथून जात असताना पुढे जात असलेल्या ट्रेलरला धडकली आणि अपघात झाला. अपघाताची खबर मिळताच बोरघाट पोलीस, आयआरबी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, सेव्ह लाईफ, लोकमान्य हॉस्पिटलची टीम अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी  घटनास्थळी दाखल झाली आहे.

मुंबई - पुणे एक्सप्रेस हाईवे वर भीषण अपघात, एक प्रवासी गंभीर जखमी
Tokyo Paralympics : अवनी लेखाराने नेमबाजी स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक

किरकोळ जखमींना उपचारासाठी पुढे पाठवण्यात आले आहे यातील एक प्रवासी गंभीररीत्या जखमी असून सात ते आठ जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाता नंतर काही काळासाठी वाहतूक थांबवून दोन्ही वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com