Tokyo Paralympics : अवनी लेखाराने नेमबाजी स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक

भारतला पॅरालिम्पकच्या इतिहासात पहिल्यांदाच शूटिंगमध्ये हे पहिले सुवर्ण पदक मिळाले आहे.
Tokyo Paralympics : अवनी लेखाराने नेमबाजी स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक
Tokyo Paralympics : अवनी लेखाराने नेमबाजी स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकSaam Tv

अवनी लेखारा हिने टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करत भारताला गोल्ड पदक मिळवून दिले आहे. अवनी लेखारा हिने 10 मिटर्स एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. भारतला पॅरालिम्पकच्या इतिहासात पहिल्यांदाच शूटिंगमध्ये हे पहिले सुवर्ण पदक मिळाले आहे. अवनीने २४९.६ चा स्कोअर बनविला आहे. अवनी ही मूळची जयपूरची आहे.

टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेतील भारताचे हे चौथं पदक आहे. भारताने आतापर्यंत एक सुवर्ण, एक कांस्य आणि दोन रौप्य पदकांवर कब्जा केला आहे. भाविना पटेल यांनी टेबल टेनिसपासून यंदा भारतासाठी पदकाची सुरुवात केली. त्यानंतर उंच उडीत निशाद कुमार यांनी तर थाळी फेकमध्ये विनोद कुमार यांनी पदक पटकावले आहे. यामध्ये आता आणखी एक नाव जोडण्यात येत आहे ते म्हणजे अवनी लेखाराचे हिने नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com