Qatar Airwaysd saam tv
देश विदेश

Kolkata Airport News : बॉम्ब.. बॉम्ब... विमानात तरुणाची आरडाओरड; कोलकाता विमानतळावर सुरक्षा यंत्रणांची पळापळ

Bomb Rumors : गदारोळानंतर क्रू मेंबर्सनी सीआयएसएफकडे तक्रार केल्यानंतर विमानात शोध घेण्यात आला.

साम टिव्ही ब्युरो

New Delhi : कोलकाता विमानतळावरील विमानात बॉम्ब असल्याचे चर्चेने एकच खळबळ उडाली. कोलकाताहून दोहाला जाणाऱ्या कतार एअरवेजच्या विमानात हा सगळा प्रकार घडला आहे. विमानातील एका तरुणाने विमानात बॉम्ब असल्याची ओरड सुरू केल्याने गोंधळ उडाला. या गदारोळानंतर क्रू मेंबर्सनी सीआयएसएफकडे तक्रार केल्यानंतर विमानात शोध घेण्यात आला.

मात्र रुणाच्या वडिलांनी त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. मात्र तरुणाने बॉम्ब असल्याची ओरड केल्यानंतर विमानतळ सुरक्षा यंत्रणा तातडीने कामाला लागली आणि काही वेळातच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने सर्व प्रवाशांना विमानातून सुखरूप बाहेर काढले. (Latest Marathi News)

चौकशीदरम्यान तरुणाने दावा केला की त्याला विमानात बॉम्ब असल्याची माहिती कोणीतरी दिली. मात्र त्या तरुणाच्या वडिलांनी आपल्या मुलाची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. याबाबत त्यांनी सीआयएसएफ अधिकाऱ्यांना कागदपत्रेही दाखवली.

विमानातील बॉम्बच्या अफवेने विमानच्या उड्डाणाला उशीर झाला. सर्वप्रथम सुरक्षा रक्षकांनी विमानातील प्रवाशांना बाहेर काढलं आणि विमानाची तपासणी करण्यात आली. मात्र विमानात काहीही संशयास्पद वस्तू न आढळल्याने विमानाला टेक ऑफची परवानगी देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhau Beej 2025: बहिणींनो, भावाला ओवाळताना या चुका मुळीच करू नका, नाहीतर...

Crime: भरचौकात तरुणाला गाठलं, चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं; थरकाप उडवणारा VIDEO

प्रवाशांसाठी खूशखबर! कल्याण ते नवी मुंबई मेट्रो प्रवास फक्त ४५ मिनिटांत; किती स्थानके अन् रूट कसा?

Shocking : मुलगा आणि सूनेच्या जाचाला कंटाळून वडिलांनी आयुष्य संपवलं; रेल्वे ट्रॅकजवळ आढळला मृतदेह

Eknath Chitnis Death: ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ. एकनाथ चिटणीस यांचे निधन; १०० व्या वर्षी अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT