Train Accident Odisha: ओडिशा रेल्वे अपघाताला आज ५ दिवस उलटून गेले आहेत. मात्र अद्यापही प्रवाशांचा शोध घेणे सुरु आहे. आतापर्यंत २८८ प्रवाशांच्या मृत्यूची आकडेवारी समोर आली आहे. जखमींची संख्या जास्त असल्याने या घटनेत मृतांचा आकडा सातत्याने वाढताना दिसत आहे. अशात देव तरी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय येणारी एक घटना समोर आली आहे. (Latest Odisha Train Accident News)
ओडिशा रेल्वे अपघातामध्ये अद्यापही बचाव कार्य सुरु आहे. ४ जून रोजी शोधकाम सुरु असताना ट्रेनच्या ढिगाऱ्याखाली एक तरुण जिवंत सापडला आहे. २ दिवसांपासून तो ढिगाऱ्याखाली फसला होता. मात्र आता त्याला सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. तरुण जिवंत असून सध्या तो बेशुद्ध अवस्थेत आहे. त्यामुळे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
अधिक माहिती अशी की, २ दिवस मृत्यूशी झुंज देऊन ढिगाऱ्याखाली सापडलेल्या या तरुणाची ओळख पटली आहे. दिलाल असं या तरुणाचं नाव आहे. तो मुळचा आसाम येथील आहे. तरुणाजवळ त्याचं पाकीट आणि मोबाईल सापडल्याने त्याची ओळख पटवण्यात यश आले. तरुणावर उपचार केल्यानंतर आता तो शुद्धीवर आला आहे.
ओडिशा ट्रेन अपघाताची सीबीआयकडे पुढील तपासाची जबाबदारी
ओडिशामध्ये (Odisha) तीन ट्रेनमध्ये झालेल्या भीषण अपघातत सातत्याने नवीन अपडेट समोर येत आहेत. अपघातानंतर तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ट्रॅकच्या इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये जाणीवपूर्वक छेडछाड केल्याचे पुरावे रेल्वेला प्राथमिक तपासात मिळाले आहेत. त्यामुळे आता या अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रेल्वेची इंटरलॉकिंग सिस्टीम अत्यंत सुरक्षित असून त्यात त्रुटी राहण्यास फारसा वाव नसतो. प्राथमिक तपासात असं समोर आलं आहे की, इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये जाणीवपूर्वक छेडछाड केल्याशिवाय बदलता येत नाही. त्यामुळे सीबीआय या अपघाताचा पुढील तपास घेणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.