Punjab Shocking News Saam Tv
देश विदेश

Shocking: प्रेमाचा भयंकर शेवट! ४ मुलांची आई असलेल्या वहिनीच्या प्रेमात झाला पागल, भांडणानंतर २५ वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल

Punjab News: ४ मुलांची आई असलेल्या वहिनीच्या प्रेमात २५ वर्षीय तरुण वेडा झाला. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणानंतर तरुणाने आत्महत्या केली. या घटनेमुळे पंजाबमध्ये खळबळ उडाली.

Priya More

Summary -

  • प्रेमप्रकरणातून तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली

  • पंजाबच्या फाजिल्का जिल्ह्यात ही घटना घडली

  • २५ वर्षीय तरुणाने वहिनीच्या प्रेमात आत्महत्या केली

  • भांडणानंतर त्याने गळफास घेत आयुष्य संपलं

पंजाबच्या फाजिल्कामध्ये प्रेमाचा भयंकर शेवट झाल्याची घटना समोर आली आहे. या ठिकाणी एक तरुण आपल्या वहिनीच्या प्रेमात वेडा झाला. कुटुंबीयांचा विरोध असताना देखील दोघं एकमेकांना भेटायचे. महिला चार मुलांची आई आहे. तर तरुण २५ वर्षांचा होता. दोघांमध्ये टोकाचे भांडण झालं. त्यानंतर रागाच्या भरात तरुणाने गळफास घेत आयुष्य संपवलं. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, फाजिल्का येथील सिंहपुरा गावात ही घटना घडली. संजय नावाच्या एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. संजयच्या कुटुंबीयांनी आरोप केला की, त्याचे वहिनीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये वाद झाला त्यानंतर संजयने घरी येऊन गळफास घेतला. संजय सुतारकाम करायचा.

संजयच्या काकांनी सांगितले की, संजयचे त्याच्या नात्यामधील एका वहिनीसोबत अनैतिक संबंध होते. गेल्या सात ते आठ वर्षांपासून त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध सुरू होते. याप्रकरणी गावात अनेक वेळा पंचायत देखील घेण्यात आली. पण दोघांमध्ये काहीच बदल झाला नाही. ते नेहमी एकमेकांना भेटायचे.

महिलेला अनेक वेळा समजावण्यात आले होते की, संजयला भेटू नको अथवा बोलू नको. पण दोघे एकमेकांशी बोलायचे आणि भेटायचे देखील. महिलेचा नवरा जेव्हा कामावर जायचा. तेव्हा ती संजयसोबत राहायची. काही दिवसांपूर्वी संजय आणि त्याच्या वहिनीमध्ये वाद झाला होता. या वादानंतर त्याने आत्महत्या केली.

गावकऱ्यांनी सांगितले की, संजयच्या घरी आम्ही गेलो होतो. तेव्हा त्याच्या घराचा दरवाजा आतून बंद होता. संजयला आवाज देऊन देखील त्याने काहीच उत्तर दिले नाही त्यामुळे दरवाजा तोडण्यात आला. गळफास घेतलेल्या अवस्थेत संजय दिसला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lotus Necklace Designs: कमळाच्या डिझाईन्सचे नाजूक आणि सुंदर नेकलेस, हे आहेत ५ ट्रेंडिंग पॅटर्न

Maharashtra Live News Update: पुण्यात महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार

Veg Soup Recipe: थंडीत जेवण वेळेवर पचत नाही? हे Veg सूप ठरेल बेस्ट, वाचा सिंपल रेसिपी

Mohammed Rafi Award 2025 : ज्येष्ठ संगीतकार ओ. पी नय्यर यांना मरणोत्तर मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार जाहीर

Nashik- Akkalkot Expressway: नाशिक-अक्कलकोट फक्त ४ तासांत, सहा लेनचा सुपरहायवे, वाचा कसा असेल हा मार्ग

SCROLL FOR NEXT