Punjab CM Bagwant Mann Wedding saam tv
देश विदेश

Bhagwant Mann Wedding: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दुसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ, कोण आहे मिसेस CM

Punjab CM Bagwant Mann Wedding: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे दुसऱ्यांदा लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाची संपूर्ण तयारी झाली आहे.

Nandkumar Joshi

चंदीगड: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दुसऱ्यांदा लग्न करणार आहेत. भगवंत मान हे पहिल्या पत्नीपासून विभक्त झाले आहेत. त्यांना दोन मुले आहेत. ते मान यांच्या पहिल्या पत्नीसोबत अमेरिकेत राहतात. चंदीगडमध्ये मान यांच्या लग्नाची सर्व तयारी झाली आहे. या लग्नसोहळ्याला विशेष पाहुण्यांची उपस्थिती राहणार आहे.

भगवंत मान (Bhagwant Mann) यांचा विवाह डॉ. गुरप्रीत कौर (Gurpreet Kaur) यांच्याशी होणार आहे. भगवंत मान यांच्या लग्नाची तयारी झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हा लग्नसोहळा होणार आहे. गुरुवारी हे लग्न साधेपणाने होणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे आपल्या कुटुंबीयांसोबत या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

भगवंत मान यांची होणारी पत्नी ही त्यांच्या कुटुंबीयांच्या परिचयातील आहे. बऱ्याच काळापासून भगवंत मान आणि त्यांची होणारी पत्नी गुरप्रीत कौर एकमेकांना ओळखतात. मिळालेल्या माहितीनुसार, भगवंत मान यांच्या लग्नाच्या तयारीची संपूर्ण जबाबदारी आम आदमी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष राघव चड्ढा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

भगवंत मान यांचा विवाह (Wedding) अत्यंत साधेपणाने होणार आहे. लग्नाचा खर्च स्वतः मान करणार आहेत. त्यांची होणारी पत्नी शिख समाजातीलच आहे. भगवंत मान आणि पहिली पत्नी इंद्रजीत यांच्यात २०१६ मध्येच घटस्फोट झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्गमध्ये विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला

Viral Video: दुकानासमोर उभा असता तो आला अन्...; भारतीय तरुणाला अमेरिकेत मारहाण, VIDEO व्हायरल

Cloudburst: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, ७ नागरिकांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

लाडकी बहिणीनंतर एकनाथ शिंदे लाडकी सुनबाई योजनेची घोषणा करणार का? अजितदादा म्हणाले...

Google Pixel 10 च्या लॉन्चची तारीख ठरली! जाणून घ्या फोनचे भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT