Himachal Pradesh Rain: मणिकर्णमध्ये ढगफुटी, ४ लोक बेपत्ता; पुढचे ३ दिवस ऑरेंज अलर्ट

कुल्लूच्या मणिकरण खोऱ्यातील चोज गावात ढगफुटी झाली असून, पुरामुळे चार लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Himachal Pradesh Rain, Latest Rain Updates
Himachal Pradesh Rain, Latest Rain UpdatesSaam Tv

शिमला: हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) बुधवारी मान्सूनने उग्र स्वरूप धारण केले. रात्री उशिरापासून मुसळधार पाऊस (Rain) सुरू आहे. कुल्लू जिल्ह्यातील मणिकर्ण खोऱ्यात ढगफुटीसारखा पाऊस सुरू आहे, पुरामुळे कॅम्पिंगची जागा वाहून गेली असून चार लोक बेपत्ता आहेत.

कुल्लूच्या मणिकरण खोऱ्यातील चोज गावात ढगफुटी झाली असून, पुरामुळे चार लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. चार जण बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच घरेही पाण्याखाली गेली असून, पुलाला तडे गेले आहेत. (Himachal Pradesh Rain Update)

Himachal Pradesh Rain, Latest Rain Updates
ओमिक्रॉनची सरकारनं घेतली धास्ती; दुकानं, शाळा, हाॅटेल आठवडाभर राहणार बंद

या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथकही घटनास्थळी रवाना झाले आहे. बुधवार रात्रीपासून कुल्लूमध्ये मुसळधार पाऊस पडत सुरु. मलाणा येथील धरणाच्या जागेचे मोठे नुकसान झाले आहे. हिमाचलमधील हवामान विभागाने बुधवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Himachal Pradesh Rain, Latest Rain Updates
Gold Silver Price: खुशखबर! स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी; सोने चांदी दरात मोठी घसरण, पाहा आजचा भाव

बुधवारपासून तीन दिवसांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी शिमला, सोलन, सिरमौर, बिलासपूर आणि कांगडा येथे येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने लोकांना नदीजवळ जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसाळ्याच्या (Rain) पहिल्या आठवड्यात हिमाचलमध्ये ४० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये रस्ते अपघातांचाही समावेश आहे. आतापर्यंत १ कोटी ३२ लाख रुपयांहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले. (Live Rain Update)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com