Satish Poonia statement on BJP Akali Dal alliance saam tv
देश विदेश

युतीची चर्चा फिस्कटली! भाजपचा एकला चलो चा नारा, राजकारणात खळबळ

BJP’s ‘Go Solo’ Call Ends Akali Dal Alliance: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिरोमणी अकाली दलाच्या युतीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. सतीश पूनिया यांनी भाजप 117 जागांवर स्वबळावर निवडणूक लढवू शकते, असे स्पष्ट केले.

Omkar Sonawane

पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या राजकारणात मोठ्या घडमोडींना वेग आला आहे. मागच्या काही दिवसांपासून भाजप आणि जुना मित्रपक्ष शिरोमणी अकाली दल पुन्हा एकदा सोबत येत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र पंजाबचे नवे प्रभारी आणि राष्ट्रीय महसचिव सतीश पुनिया यांनी स्पष्ट सांगत या सगळ्या वावड्यांवर आता पूर्णविराम लावला आहे. चंडीगडमध्ये पत्रकार परिषदेत संवाद साधता असताना म्हणाले मी पुन्हा एकदा सांगतो की भाजप स्वबळावर 117 जागांवर निवडणूक लढवू शकते. सतीश पुनिया यांच्या या विधानामुळे आगामी निवडणुकीत भाजप आणि सुखबीर बादल यांच्यात युती संदर्भात कुठलाही निर्णय झाला नसल्याचे संकेत दिले.

पुनिया यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा पंजाब भाजपमध्येच याबाबत दोन वेगवेगळे सूर ऐकायला मिळत होते. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिदर सिंह आणि प्रदेश भाजप अध्यक्ष सुनील जाखड यांसारखे वरिष्ठ नेते अकाली दलासोबत पुन्हा आघाडी करण्याच्या बाजूने होते. पंथीक आणि हिंदू मतदारांना एकत्र आणण्यासाठी ही आघाडी फायदेशीर ठरू शकते असा त्यांचा दावा होता. त्यातच अकाली दलाच्या नेत्यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटींमुळेही पुन्हा एकदा आघाडीच्या चर्चांना उधाण आले होते. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान पंतप्रधान मोदी आणि अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांची भेट झाली होती. तसेच, काही दिवसांपूर्वी सुखबीर बादल यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी त्यांची विचारपूस केली होती. त्यामुळे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्याची शक्यता असल्याच्या चर्चांना बळ मिळाले होते.

मात्र, पंजाब भाजपचे नवे प्रभारी सतीश पूनिया यांनी 117 जागांवर स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. पूनिया यांनी स्पष्ट केले की, ते दिल्लीतील भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा थेट संदेश घेऊन पंजाबमध्ये आले आहेत. नेत्यांची पंतप्रधानांसोबत भेट झाली म्हणजे त्याचा अर्थ राजकीय आघाडी असा होत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anganwadi Sevika: अंगणवाडी सेविकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा; पर्यवेक्षिकेसाठी लागू असलेली वयाची अट रद्द

गरब्यासाठी भाड्यानं पार्टनर मिळणार?गरब्यासाठी मुलींची बोली, संभागी ब्रिगेड आक्रमक

Fact Check: गाड्यांवर लिंबू-मिरची लावल्यास दंड? गाडी मालकाला 5 हजारांचा दंड लागणार?

कागदावर केमिकल टाका, नोटा तयार करा? 500ची नोट तयार करणारं 'केमिकल रॅकेट'

पेट्रोल पंपावर UPI शुल्क बंद होणार? UPI शुल्काविरोधात पंप चालक आक्रमक

SCROLL FOR NEXT