पंजाबमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आणखी एका मोठ्या पक्षासोबत युती केली. भाजपने पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलासोबत युती केली. भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीतून युतीची मोठी घोषणा केली. आज दिल्लीमध्ये भाजप आणि शिरोमणी अकाली दल यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला अमित शाह आणि अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी एकत्रित युतीची घोषणा केली.
अमित शाह यांनी या पत्रकार परिषदेदरम्यान अकाली दलाचे एनडीएमध्ये स्वागत केले. अमित शाह यांनी यावेळी सांगितले की, आज आमचा सर्वात जुना मित्रपक्ष एनडीएमध्ये परत आला. पंजाबला अमली पदार्थ आणि भ्रष्टाचारापासून मुक्त करणे हा आमच्या युतीचा मुख्य उद्देश आहे. आम्ही अमली पदार्थमुक्त पंजाब करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२९ ची अंतिम मुदही निश्चित केली आहे. लवकरच आम्ही आमच्या जाहीरनाम्यात महत्वाच्या घोषणा करू.'
अमित शाह यांनी पुढे सांगितले की, सुखबीर सिंग बादल आणि नितीन नवीन हे गेल्या ३ महिन्यांपासून युतीसाठी वाटाघाटी करत होते. त्यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीत विजयाचा दावा देखील केला. आम्हाला आशा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पंजाबची जनता आम्हाला विजयी करेल. अकाली दल मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. पंजाबमध्ये मुख्यमंत्री अकाली दलाचा होईल.'
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी देखील अकाली दलाचे एनडीएमध्ये स्वागत केले. 'भाजप आणि शिरोमणी अकाली दलाची युती नैसर्गिक आहे. ही युती पंजाबच्या जनतेसाठी आणि हिंदू-शीख ऐक्यासाठी फायदेशीर राहिल.', असे त्यांनी सांगितले. भाजप आणि अकाली दलाची युती झाल्यानंतर आता दोन्ही पक्षाचे नेते निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. '
तसंच, भाजप आणि शिरोमणी अकाली दलाने याआधी ५ वेळा युती करून निवडणुका लढल्या आहेत. या दोन्ही पक्षांनी १९९७, २००२, २००७, २०१२ आणि २०१७ मध्ये एकत्र येत निवडणुक लढल्या. या ५ पैकी ३ वेळा त्यांनी एकत्र सरकार स्थापन केले. या दोन्ही पक्षांनी १९९७, २००७ आणि २०१२ मध्ये पंजाबमध्ये सरकार स्थापन केले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.