Punjab Transport Minister Laljeet Bhullar Arrest  Saam Tv
देश विदेश

Political News : आधी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, आता पोलिसांकडून अटक; बड्या नेत्याला बेड्या ठोकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Punjab Transport Minister Laljeet Bhullar Arrest : पंजाबमधील आत्महत्येच्या प्रकरणात माजी मंत्री लालजीत भुल्लर यांना अटक करण्यात आली आहे. मानसिक छळाच्या आरोपांमुळे त्यांनी आधी राजीनामा दिला होता.

Alisha Khedekar

  • पंजाबच्या माजी मंत्र्याला आत्महत्येच्या प्रकरणात अटक

  • गगनदीप रंधावा यांनी व्हिडिओत भुल्लर यांच्यावर आरोप केले

  • पत्नीच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल

  • या घटनेमुळे पंजाबच्या राजकारणात खळबळ

पंजाबच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. पंजाब वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनच्या अधिकारी गगनदीप सिंग रंधावा यांनी आत्महत्या केल्याच्या आरोपाखाली परिवहन मंत्री लालजीत भुल्लर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर, आता त्यांना पोलिसांनी अटक केल्याची बातमी समोर आली आहे. त्यांना अमृतसर न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, गगनदीप सिंग रंधावा हे पंजाब स्टेट वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन येथे जिल्हा व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. २१ मार्च रोजी सकाळी रंधावा यांनी विष प्राशन केले. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली आणि रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्यांनी एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता, या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या मृत्यूसाठी थेट लालजीत भुल्लर यांना जबाबदार धरलं आहे.

या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, लालजीत भुल्लर यांनी सतत मानसिक छळ केला. यामुळे मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे. व्हिडिओचा पुरावा आणि रंधावा यांच्या पत्नीने केलेल्या आरोपानंतर भुल्लर यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती. त्यानंतर त्यांनी परिवहन मंत्री पदाचा राजीनामा दिला.

दरम्यान याप्रकरणी रंधावा यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे रणजित एव्हेन्यू पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीत माजी मंत्री लालजीत भुल्लर, त्यांचे वडील सुखदेव सिंग आणि काही लोकांवर सतत छळ करणं, मानसिक दबाव टाकणं आणि धमकावणं असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांखाली आता लालजीत भुल्लर यांना फतेहगड साहिब जिल्ह्यातील मंडी गोविंदगड येथून अटक केली. या घटनेनंतर राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Back Pain Causes: सतत पाठदुखी होते? दुर्लक्ष करू नका, ही 5 कारणं ठरू शकतात धोकादायक

म्हाडाकडून अतिक्रमणावर कारवाई झाली नाही, तक्रारदार भडकला; वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कार्यालयात घातला गोंधळ

MHADA Lottery: मुंबईत घ्या हक्काचे घर! म्हाडाच्या २५०० घरांची लॉटरी, लोकेशन काय असणार?

Maharashtra Live News Update: पुणे पोलिस राबवणार 'ऑपरेशन फ्लश आऊट', हातभट्टीच्या कारखान्यांवर होणार कारवाई

Petrol: 'पेट्रोल बंद होणार' असल्याचा मेसेज व्हायरल, मध्यरात्री पेट्रोल पंपावर तोबा गर्दी; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT