Accident News : महामार्गावर अपघाताचा थरार! प्रवाशांनी खचाखच भरलेली बस उलटली, दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू

Jaipur Delhi Bus Acccident News : दिल्लीतील करोल बाग परिसरात स्लीपर बस उलटून भीषण अपघात झाला असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Accident News : महामार्गावर अपघाताचा थरार! प्रवाशांनी खचाखच भरलेली बस उलटली, दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू
Jaipur Delhi Bus Acccident NewsSaam Tv
Published On
Summary
  • दिल्लीत स्लीपर बस उलटून भीषण अपघात

  • २ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

  • जखमींना रुग्णालयात दाखल

  • अपघातामुळे खळबळ

Delhi Double Decker Bus Accident News : दिल्लीत आज पहाटेच्या सुमारास ३० प्रवाशांना घेऊन जाणारी स्लीपर बस उलटल्याने भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत बसचा चक्काचूर होऊन २ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर अपघात मध्य दिल्लीतील करोल बाग परिसरातील झंडेवाला मंदिरा जवळ घडला आहे. अपघातग्रस्त बस जयपुरवरून दिल्लीला जात होती. मंगळवारी मध्यरात्री १ वाजता ३० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या या बसच नियंत्रण सुटून दुर्घटना घडली. रात्री उशिरा बस उलटल्याचा फोन अग्निशमन दलाला आला. माहिती मिळताच, दिल्ली पोलीस आणि अग्निशमन दलाची पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले.

Accident News : महामार्गावर अपघाताचा थरार! प्रवाशांनी खचाखच भरलेली बस उलटली, दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू
Shocking : भाजप नेत्याच्या मुलाचे सेक्स स्कँडल उघड; २५ हून अधिक मुलींचे शोषण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तसेच अपघातग्रस्त बसचा चक्काचूर झाला आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेत मृत झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com