Priyanka Gandhi Rally Saam Tv
देश विदेश

Priyanka Gandhi : माझ्या शहीद आजी आणि शहीद वडिलांना देशद्रोही बोलल्यावर गप्प का बसू? प्रियांका गांधी कडाडल्या

Priyanka Gandhi on bjp : . 'माझ्या शहीद आजी आणि शहीद वडिलांना देशद्रोही बोलल्यावर गप्प का बसू? असा सवाल करत प्रियांका गांधींनी भाजपवर तोफ डागली आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीमुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. भाजपकडून राजीव गांधी यांच्यावरही टीका केली जात आहे. यावरुन आता प्रियांका गांधी यांनीही भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलं. 'माझ्या शहीद आजी आणि शहीद वडिलांना देशद्रोही बोलल्यावर गप्प का बसू? असा सवाल करत प्रियांका गांधींनी भाजपवर तोफ डागली आहे.

'इंडिया टुडे' ग्रुपशी बोलताना प्रियांका गांधींनी भाजपवर टीका केली. 'आमच्या कुटुंबाने देशासाठी बलिदान दिलं असेल, तर आम्हाला लाज वाटायला पाहिजे का? मला अभिमान आहे की, माझ्या आजीने देशासाठी ३३ गोळ्या खाल्ल्या. माझे वडील देशासाठी शहीद झाले. त्यामुळे मी बोलत राहील, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.

प्रियांका गांधी म्हणाल्या,'पंतप्रधान मोदी मुलाखतीत मतांसाठी रडू लागतात. खरंतर मी १९ वर्षांची असताना माझ्या वडिलांचे तुकडेच घरी आले होते. त्यामुळे मी या गोष्टी का बोलू नये? तुम्ही बोलत आहे की, माझ्या वडिलांनी कायदे बदलले. इंदिरा गांधींची संपत्ती कराशिवाय घेण्यासाठी कायद्यात बदले केले, या बाबी किती खोट्या आहेत. असं सर्व खोटे पसरवलं जात आहे. त्यामुळे आम्ही गप्प का बसायचं? मला माझ्या कुटुंबावर गर्व आहे'.

'मी गावागावात जाते. एका गावात महिलेने मला थांबवलं. मी कारची खिडकी उघडली. त्यानंतर तिने दोन्ही हात माझ्या डोक्यावर ठेवत, विजयी भव: म्हणाली. त्यानंतर मला रडूच आलं, असं आमचं नातं आहे. या गोष्टी पंतप्रधान मोदींना कळणार नाहीत. आम्ही या गोष्टी विसरू शकत नाही', अशा त्या पुढे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shikhar Dhawan: शिखर धवन ED च्या रडारवर; ऑनलाईन बेटींग प्रकरणात अडकला माजी क्रिकेटर

Maharashtra Live News Update: माणगावमध्ये सशस्त्र दरोडा, महिलेची हत्या

Lumpy Disease : धुळे जिल्ह्यात लंम्पी संसर्ग वाढला; तीन किमी परिसर बाधित क्षेत्र घोषित

Vastu Tips: मंदिरात या ६ वस्तू दान करा, घरात येईल सुख-समृद्धी

Maratha Reservation: ...तर त्या नेत्यांवर बहिष्कार टाकू, लक्ष्मण हाकेंच्या धमकीला ओमराजे निंबाळकरांचे उत्तर; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT