Maharashtra Politics 2024 : '४ जूनला आमच्या शपथविधीला या'; उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं निमंत्रण

Lok Sabha Election 2024 : ४ जूनला इंडिया आघाडीचं देशात सरकार येत असल्याचा उद्धव ठाकरे यांनी विश्वास व्यक्त केला आहे. इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीचं नरेंद्र मोदींना निमंत्रण देत त्यांनी डिवचलं आहे.
Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024Saam Digital

देशात इंडिया आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचं सरकार येत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी १० वर्ष सत्तेत आहेत. आता त्यांनी विश्रांती घ्यावी आणि आमच्या इंडिया आघाडीच्या ४ जूनच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीला यांवं, असं आमंत्रण देत उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना डिवडलं आहे. खुर्चीवर असताना त्यांना महत्त्व असतं खुर्ची गेली की त्यांना कोणी विचारत नाही म्हणून आज आमंत्रण देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

यांना स्वतच्या नावाने मैदान देखील बुक करता येत नाही. ४ जूननंतर इंडिया आघाडीचा पंतप्रधान होईल. त्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रण देतो, पण आम्ही नवाज शरीफ यांना बोलवत नाही. पंतप्रधानपदासाठी २०१४ मध्ये नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला होता आणि आज ते आम्हाला नकली शिवसेना म्हणत आहेत. पण मी सिक्सर मारणार, हा सामना आपल्याला जिंकायचा नाही तर जिंकलेला आहे.

तुम्हाला विचारल्याशिवाय इथे एकही वीट रचू देणार नाही, इथे निष्ठावंत आहेत. ज्यांची चौकशी झाली जे भ्रष्टाचारी आहेत, मात्र त्यामुळे तोच पैसा वाटला जातोय. इथे विविध पक्षाचे लोक आहेत, देशाला एकसंघ ठेवण्यासाठी सर्वपक्ष एकत्र आले आहेत. मी सांगितल राजीनामा द्या, तेव्हा एकही प्रश्न न विचारतां त्यांनी राजीनामा दिल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

Maharashtra Politics 2024
Ramdas Athawale : मविआला देत आहोत अशी टक्कर की, नेत्यांना आली पाहिजे चक्कर; आठवलेंचा चारोळीतून विरोधकांना भन्नाट टोला

महाराष्ट्रातील लोकसभेच्या उर्वरित 13 जागांसाठी 20 मे रोजी मतदान होणार असून आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता. मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे या मतदारसंघात मतदान होणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी विक्रोळी, दादर आणि भगतसिंग नगर येथे जाहीर सभांना उद्धव ठाकरेंनी संबोधित केलं.

Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024 : 'त्यांच्या ४८ नाही तर ४९ जागा येतील'; उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर फडणवीसांचा खोचक टोला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com