Delhi Politics : निवडणुकीआधीच दिल्लीत मोठी घडामोड; राघव चढ्ढा लंडनहून परतताच घेतली CM केजरीवालांची भेट, चर्चा गुलदस्त्यात

Raghav Chadha Meet CM Arvind Kejriwal: आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा लंडनहून परतले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे.
राघव चढ्ढा
Delhi PoliticsSaam Tv

आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा लंडनहून परतले आहेत. त्यांनी आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. आता या भेटीचं कारण काय, त्यांच्यात चर्चा काय झाली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु याकडे मोठी राजकीय घडामोड म्हणून पाहिलं जात आहे. मागील काही महिन्यांपासून राघव चढ्ढा राजकारणात सक्रिय नव्हते.

कथित दारू घोटाळ्यात (Lok Sabha 2024) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यापासून राघवन चढ्ढा यांनी देखील मौन बाळगलं होते. त्यांच्याकडून कोणतंही वक्तव्य करण्यात आलं नव्हतं. राघव चढ्ढा त्यांच्या डोळ्यांवर उपचार करत असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा रंगल्या होत्या. राघव चड्डा भाजपमध्ये प्रवेश करणार की नाही, असा प्रश्न देखील अनेकांना पडला होता.

पण आता राघव चढ्ढांनी या सर्व अटकळांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आहे. आता निवडणुकीतही ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार (Raghav Chadha Meet CM Arvind Kejriwal) असल्याचं सांगितलं जात आहे. अजून तरी त्यांच्या डोळ्यांची स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र, २५ मे रोजी मतदानापूर्वी ते प्रचार करताना दिसणार असल्याचं समोर येत आहे. आम आदमी पक्षासाठी ही दिलासादायक बातमी आहे. कारण राघव चढ्ढा तरुणांमध्ये लोकप्रिय मानले जातात. याशिवाय दिल्लीतील पंजाबी मतदारांमध्येही त्यांचा चांगला प्रभाव असल्याचं मानलं जातं (Delhi Politics) आहे.

राघव चढ्ढा
BJP On AAP: पंजाबमध्ये दिल्लीपेक्षा मोठा दारू घोटाळा, ईडीने तपास करावा; भाजपचा गंभीर आरोप

आम आदमी पक्ष निवडणुकीपूर्वीच कठीण टप्प्यातून जात आहे. एकीकडे कथित दारू घोटाळ्यामुळे अडचणी वाढलेल्या आहेत, तर दुसरीकडे स्वाती मालीवाल यांच्यासोबत झालेल्या मारहाणीच्या प्रकरणामुळे वातावरण तापलं (Aam Aadmi Party News) आहे. दिल्लीत २५ मे रोजी सात जागांवर मतदान होणार आहे. आम आदमी पक्षाची काँग्रेससोबत युती आहे. त्यामुळे जागावाटप देखील त्याच पद्धतीनं झालं आहे. आम आदमी पार्टी स्वतः ४ जागांवर निवडणूक लढवत असून काँग्रेसने तीन जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.

राघव चढ्ढा
AAP Protest : अरविंद केजरीवालांच्या अटकेनंतर आप कार्यकर्ते आक्रमक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा इशारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com