AAP Protest : अरविंद केजरीवालांच्या अटकेनंतर आप कार्यकर्ते आक्रमक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा इशारा

AAP Protest In Delhi : या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी कलम 144 लागू करण्यात आल्याची घोषणा केलीये. आंदोलनासाठी कोणालाही परवानगी नाही. हा परिसर लवकरात लवकर खाली कार, असं पोलिसांनी कार्यकर्त्यांना म्हटलं आहे.
AAP Protest
AAP ProtestSaam TV

PM Residence :

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांनी दिल्लीमध्ये दाखल होत मोदींच्या निवास्थानी घेराव घालण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज दिल्लीतील पटेल चौक मेट्रो स्टेशनबाहेर कार्यकर्त्यांनी जमण्यास सुरूवात केली आहे.

AAP Protest
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! अलीपूरमध्ये कारखान्याला भीषण आग; अग्निशमन दलाचे ३४ बंब घटनास्थळी, थरारक VIDEO

या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी कलम 144 लागू करण्यात आल्याची घोषणा केलीये. आंदोलनासाठी कोणालाही परवानगी नाही, हा परिसर लवकरात लवकर खाली कार, असं पोलिसांनी कार्यकर्त्यांना म्हटलं आहे.

आम आदमी पक्षाच्या निदर्शनाच्या घोषणेनंतर दिल्ली पोलीस अॅक्टीव मोडमध्ये आहेत. पोलिसांनी राजधानीच्या मध्यवर्ती भागात येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांवर काही निर्बंध घालून विशेष व्यवस्था केली आहे.

यामध्ये मध्य दिल्लीतील वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. तुळगाक रोड, सफदरजंग रोड आणि कमाल अतातुर्क मार्गावर वाहने पार्क करण्यास परवानगी नसल्याचं वाहतूक पोलिसांनी म्हटलं आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली आहे. ईडीने कारवाई करत न्यायालयाने त्यांना २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. यानंतर केजरीवाल यांनी दिल्लीचा कारभार तुरुंगातूनच चालवणार अशी घोषणा केली. तसेच रविवारी पहिला आदेश जारी करत आपल्या मंत्र्यांना काही सूचना दिल्या आहेत.

AAP Protest
Pune Crime: मुलीला अपशब्द वापरले, संतापलेल्या नातेवाईकाच्या मारहाणीत तरूणाचा मृत्यू; बिबेवाडीतील खळबळजनक घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com