Netanyahu Faces Arrest Threat 
देश विदेश

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू देशात येताच अटक करू; इराणसोबतच्या चर्चेदरम्यान आणखी एका देशाची इस्त्रायलला धमकी

Netanyahu Faces Arrest Threat : मध्य पूर्वमध्ये सुरू असलेल्या तणावादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कोणत्या देशाने इस्रायलला इशारा दिला आहे, हे जाणून घेऊ.

Bharat Jadhav

  • हंगेरीने इस्रायलला दिलेल्या इशाऱ्याचं कारण काय?

  • हंगेरीचे पंतप्रधान यांनी हा इशारा दिला आहे.

  • मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर नवा वाद

इराणनंतर लेबनॉनसोबतचे युद्ध इस्रायलसाठी एक समस्या बनत आहे. अमेरिकेने आता लेबनॉन आणि इस्रायल यांच्यात मध्यस्थी करू शकतो असा प्रस्ताव दिला आहे. त्याचदरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना अटक होणार असल्याची चर्चा आहे. हंगेरीचे नवनियुक्त पंतप्रधान पीटर मॅग्यार यांनी नेतान्याहू हंगेरीमध्ये आल्यास त्यांना अटक केली जाईल, असा इशारा दिला आहे.

१२ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पीटर मॅग्यार हे हंगरीचे पंतप्रधान झाले. त्यांनी १६ वर्षांपासून सत्तेत असलेल्या विक्टर ओर्बन यांना पराभूत केलं. मॅग्यार यांच्या टिस्झा (TISZA) पक्षाने नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असणार दोन तृतीयांश बहुमत मिळवले आणि हंगरीमध्ये सत्ता स्थापन केली.

स्काय न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार पीटर म्हणाले की, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या (आयसीसी) वॉरंटचा सामना करणाऱ्या आणि हंगरीमध्ये प्रवेश करणाऱ्या कोणालाही ताब्यात घेतले जाईल. पुढे बोलताना नवनिर्वाचित पंतप्रधान म्हणाले की, हंगरी आयसीसीचा सदस्य राहील. तसेच मागील सरकारचा आयसीसीमधून माघार घेण्याचा निर्णय मागे घेतला जाईल.

पंतप्रधान मॅग्यार यांच्या विधानामुळे जगातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जगातील स्थिती पाहता पीटर मॅग्यार यांनी इस्रायल यांना दिलेला इशाऱ्याने तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण काही दिवसापूर्वीच पीटर मॅग्यार यांनी नेतान्याहू यांना हंगरीला भेट देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्याबाबत पीटर म्हणाले की, निवडणूक जिंकल्यानंतर ते १९५६ च्या उठावाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांना अनेक देशांतील नेत्यांना आमंत्रित करत होतो.

या कार्यक्रमासाठी नेतान्याहू यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. नेतान्याहू यांना आधीच सांगण्यात आलंय की, हंगरी आयसीसीच्या नियमांचे पूर्णपणे पालन करेल आणि कायद्याच्या मागे हटणार नाही. खरे तर, २०२४ मध्ये आयसीसीने नेतान्याहू यांच्याविरुद्ध युद्ध गुन्हे आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या आरोपाखाली अटक वॉरंट जारी केले होते. याच कारणामुळे हा संपूर्ण वाद निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Problems: तुमची झोप नीट होत नाहीये? रोजच्या या ५ सवयींमुळं उद्ध्वस्त होतेय रात्रीची विश्रांती

Hot Chocolate Recipe: लहान मुलांसाठी झटपट बनवा झटपट टेस्टी हॉट चॉकलेट, वाचा सोपी रेसिपी

Green Tea vs Black Tea vs Lemongrass Tea: ग्रीन टी, लेमनग्रास टी की ब्लॅक टी? तुमच्या आरोग्यासाठी बेस्ट चहा कोणता?

Maharashtra News Live Update: दादर-शिवाजी पार्क परिसरात CJP आंदोलकांवर पोलिसांची कारवाई

Navratri 2026 Date: नवरात्री 10 की 11 ऑक्टोबरला सुरू? तारीख नक्की जाणून घ्या

SCROLL FOR NEXT