Sakshi Sunil Jadhav
यंदाची शारदीय नवरात्री ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सुरू होऊन १९ ऑक्टोबरपर्यत चालेल.
नवरात्रीचा मुख्य उत्सव नऊ रात्री आणि दहा दिवसांचा असून दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते.
पौराणिक पंरपरेनुसार देवी दुर्गा आणि महिषासुर यांच्यातल्या युद्धातून वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून नवरात्रीशी जोडलं जाते.
नवरात्रीमध्ये शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा,स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या नवदुर्गांची पूजा केली जाते.
पहिल्या दिवशी घटस्थापना किंवा कलशस्थापना करून देवीचे आवाहन केले जाते आणि अनेक घरांमध्ये धान्याची पेरणीही केली जाते.
१९ ऑक्टोबरला नवमी पूर्ण झाल्यानंतर २० ऑक्टोबर २०२६ रोजी विजयादशमी (दसरा) साजरी होईल.
महाराष्ट्रात देवीची पूजा, घटस्थापना, उपवास, आरती आणि विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे नवरात्री साजरी केली जाते.
गुजरातमध्ये नवरात्रीच्या रात्री पारंपरिक पोशाखात गरबा आणि दांडिया खेळण्याची विशेष परंपरा आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.