मलबार हिल येथील ऐतिहासिक बाणगंगा तलावात पुन्हा मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळले.
तलावात वारंवार पिंडदानाचे विधी केले जातात.
विधीनंतर निर्माल्य तलावात टाकले जात असल्याने पाणी दूषित होत असल्याचा आरोप.
तलावातील प्रदूषणामुळे माशांचा मृत्यू होत असल्याची शक्यता व्यक्त.
जागरूक नागरिक यांच्याकडून वारंवार या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले जात आहे.
मात्र, मुंबई महापालिका आणि बाणगंगा ट्रस्टकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केलीय.
एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीमान्यासाठी पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन चालू आहे.विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे राहुल गांधींनी लक्ष घातले असून त्यांनी थेट ट्विट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी केलीय. राहुल गांधींनी ट्विट करत एमपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केलीय. तसेच MPSC मध्ये सुधारणा करा, परीक्षा पद्धती पारदर्शक करा आणि या विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घ्या. काहीच झाले नाही. म्हणूनच आज तेच विद्यार्थी पुण्यात सत्याग्रहावर बसले असल्याचं राहुल गांधी म्हणालेत.
बाळासाहेबांना हवा असलेला पक्ष आम्ही स्थापन करू शकलो नाही. सर्व रिपब्लिकन पक्ष एकत्र आले नाहीत. सर्व समाज आमच्या बरोबर आला नाही. सर्व धर्मीय आमच्या पक्षात आले नाहीत. आम्ही सर्व रिपब्लिकन पक्ष एकत्र आले तर आमची ताकद वाढेल, पण तसे होत नाही.आमच्या कार्यकर्त्यांनी मित्र पक्षांवर अवलंबून राहता कामा नये. आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेत जागा दिल्या जात नाहीत.सत्तेची पदे दिली जात नाहीत.
दुष्काळसदृश परिस्थिती व संभाव्य पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर कुडाळ पंचायत समितीत आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी करण्यात आली. कामचुकार अधिकाऱ्यांना मेमो काढण्याचे आदेशच आमदार निलेश राणे यांनी प्रांताधीका-यांना दिले. तर कामांकडे दुर्लक्ष केल्याच्या प्रश्नांवरून जलसंधान व भूजल विभागाच्या अधीका-यांनाही निलेश राणेंनी धारेवर धरले. सिंधुदुर्ग जिल्हा सध्या टंचाईच्या 'ट्रिगर वन' मध्ये समाविष्ट करण्यात आला असून कुडाळ तालुक्यातील १८० वाड्यांसाठी तब्बल ३ कोटी ७७ लाख रुपयांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. तालुक्यातील २३० पैकी ६५ बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ७ कोटींची गरज असताना कामे रखडल्याबद्दल आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
मुक्ताईनगर जळगाव
एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानाची ड्रोन च्या माध्यमातून रेकी केल्याचा एकनाथ खडसेंचा संशय
एकनाथ खडसेंनी पोलिसांकडे चौकशीची मागणी केली आहे
या आधीही एकनाथ खडसेंचा कॉल रेकॉर्ड होत असल्याचा संशय खडसेंनी व्यक्त केला
राज्यात महाविकास आघाडीचं सेव्ह डेमोक्रसी संयुक्त आंदोलन
इंडिया आघाडीच्या ठरावानंतर महाविकास आघाडीने संयुक्त आंदोलन
२ ऑक्टोबरपासून ८ ऑक्टोबरपर्यंत जिल्हानिहाय आंदोलन हाती घेण्यात येणार
तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित बसून मोर्चासाठी नियोजन करण्याचा प्रस्ताव मंजूर
१ नोव्हेंबरच्या दिल्लीतील महासभेसाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत ठराव
महाविकास आघाडीच्या आमदार खासदारांना सोबत घेऊन एकत्रित आंदोलन करण्याची भूमिका
पावसाळा संपला असून पर्यटन हंगाम सुरु होत आहे. शासनाने रायगडमध्ये पावसाळी पर्यटनावर घातलेले निर्बंध उठवल्यानंतर आता रायगडच्या समुद्र किनारी पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. समुद्राच्या लाटा आणि येथील वॉटर स्फोर्टची मजा लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात काल चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला,चंद्रशेखर बावनकुळे काल भोकरदन तालुक्यातल्या दगडवाडी गावात दुष्काळ पाहणी करण्यासाठी आले होते मात्र दौरा संपल्यानंतर बावनकुळे निघून गेले आणि शेतकरी आपापल्या घरी निघून जात असताना एका शेतकऱ्याला या टोळीने चाकूचा धाक दाखवत 12 हजार रुपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आला होता,भोकरदन पोलिसांनी सखोल तपास करत या आंतरजिल्हा टोळीला ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.दरम्यान पोलिसांच्या तपासानुसार ही टोळी काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या करमाड पासून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यात सहभागी असल्याची माहिती देखील समोर आलीय.त्यामुळे मंत्र्यांच्या दौऱ्यात सुरक्षा व्यवस्था असूनही चोरट्यांनी गर्दीमध्ये हात साफ केल्याने आता सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे..
उद्याच्या मोर्चाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे. व्यवस्थित शिस्तीत मोर्चा पार पडावा यासाठी पोलिसांसोबत चर्चा झाली. उद्या गर्जना आपल्याला इथे पाहायला मिेळेल, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.
सुतारवाडी परिसरातील खिल्लारे फार्महाऊसच्या विहिरीमध्ये वयोवृद्ध आई आणि मध्यमवयीन मुलाचा मृतदेह सापडला आहे. हे दोघे माय-लेक गेल्या दोन महिन्यांपासून फार्महाऊसवर काम करीत होते. फार्महाऊसमधील विहिरीबाहेर चपला आणि विहिरीत महिलेचा मृतदेह आढळून आला. SVRSS या बचाव पथकामार्फत शोध घेतला असता विहिरीमध्ये दुसरा मृतदेहही आढळून आला. याप्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस तपास करीत आहेत.
पक्ष नाही तर अपक्ष म्हणून तरी ही लढाई लढणार
शिवसेनेतूनच मंगेश चिवटे व सानप दोन नावांची चर्चा.
तर भाजप ही पुणे शिक्षक मतदार संघासाठी ठाम
सानप हे पुणे वाडिया कॉलेज मध्ये राज्यशास्त्र चे प्राध्यापक
त्यामुळे हा तिढा कधी सुटणार याकडे सर्वांचे लक्ष.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची रणधुमाळी जसजशी जवळ येत आहे, तसतशी महायुतीमधील अंतर्गत बंडखोरी आणि धुसफूस चव्हाट्यावर येऊ लागली आहे....
महायुतीच्या अधिकृत उमेदवाराची घोषणा होण्यापूर्वीच आघाडीतील घटक पक्ष आणि त्यांच्या नेत्यांमधील तणाव उघड होतं आहेत...राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांनी थेट विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे (वि.मा.शी.) उमेदवार दिलीप कडू यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरून महायुतीला मोठा धक्का दिला आहे...दिलीप कडू यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेआधी खोडके दांपत्याच्या उपस्थितीत एक भव्य सभा पार पडली... यानंतर शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयावर जात दिलीप कडू यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. या शक्तिप्रदर्शनाला नागपूरचे आमदार सुधाकर आडबाले यांचीही प्रमुख उपस्थिती होती. महायुतीचा अधिकृत निर्णय होण्याआधीच राष्ट्रवादीच्या मातब्बर आमदारांनी उघडपणे 'वि.मा.शी.'च्या उमेदवाराला ताकद दिल्याने महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची चिंता कमालीची वाढली असून, या मतदारसंघात महायुतीची डोकेदुखी आणखी वाढल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा समोर आले आहेत. श्रीकांत देशपांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता दिलीप कडू यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यावेळी आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके आणि आमदार सुधाकर आडबाले उपस्थित राहिले. त्यामुळे महायुतीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच स्थानिक पातळीवर वेगळी राजकीय भूमिका घेतली जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
उल्हासनगर मध्ये भाजपा शिवसेने विरोधात आक्रमक
उल्हासनगर महापालिकेत युती मधून बाहेर पडण्याची घोषणा
यापुढे कोणत्याही निवडणुकात खासदार श्रीकांत शिंदे यांना सहकार्य न करता काम न करण्याची भूमिका
नुकत्याच पार पडलेल्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडी मध्ये शिवसेनेने खेळी केल्याने भाजपा आक्रमक
आमदार कुमार आयलानी, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारीया यांनी पत्रकार परिषद घेऊन केली भूमिका स्पष्ट
महापौर पती कमलेश निकमांवर जहरी टीका
ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय नेते एकवटले आहेत. ठाण्यातील टीप टॉप प्लाझा येथे सर्वपक्षीय पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, ठाकरे गटासह विविध पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. ‘भयमुक्त ठाण्या’साठी सर्वपक्षीय नेते आपली भूमिका मांडणार असून, पूर्णेकर हत्या प्रकरणानंतर काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नंदुरबार मध्ये महायुतीतला अंतर्गत वाद पुन्हा एकदा चहाट्यावर....
आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर भाजप जिल्हाध्यक्ष नीलेश माळींचा पलटवार..
शिंदेंमुळे भाजपला जीवनदान.या रघुवंशींच्या वक्तव्याचा माळींकडून खरपूस समाचार...
संधीसाधूपणा हा चंदूभाईंचा स्थायीभाव नीलेश माळींची घणाघाती टीका...
आधी काँग्रेस, मग ठाकरे गट आणि आता शिंदे गट' माळींनी काढली रघुवंशींची राजकीय कुंडली...
आमदार रघुवंशींची विधाने अत्यंत बालिश असल्याचा माळींचा आरोप...
सलगच्या सुट्ट्यांमुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटकांनी रायगड जिल्ह्याकडे धाव घेतली असून समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजून गेले आहेत. पावसाळ्यात सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आलेले समुद्रकिनारे आता पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहेत. दिवेआगर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनाऱ्यांवर विशेष खबरदारी घेतली जात असून सुरक्षेच्या उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे.
बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी फेसबुकवर भावनिक पोस्ट करत एका कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नसल्याचे म्हटले आहे. “स्वर्गीय काकू, मला माफ करा, मी कार्यक्रमाला येऊ शकत नाही,” असे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे. कार्यक्रम पत्रिकेत एका व्यक्तीचे नाव असल्याने सामाजिक एकोपा बिघडल्याचा आरोप करत त्यांनी कार्यक्रमाला येणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या प्रारूप मतदार यादीत बीड तालुक्यातील कुंभारी (पोथरा) येथील एका नोंदीबाबत वाद निर्माण झाला आहे. अनुक्रमांक ४४८ वरील नावात ‘ऋषिकेश उद्धव ठाकरे’ आणि त्याखाली ‘उलथापालथ करा’ असा मजकूर असल्याचा दावा सोशल मीडिया पोस्टद्वारे करण्यात आला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत शिवसेना (उबाठा) गटाचे मराठवाडा समन्वयक दिलीप घुगे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची माहिती दिली.
एल निनोच्या प्रभावामुळे नंदुरबार जिल्ह्यात तापमानात वाढ होत असून, पारा 35 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. सातत्याने वाढत असलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक हैराण झाले असून, दुपारच्या वेळी उकाड्याचा त्रास जाणवत आहे. तापमान वाढल्याने नागरिकांना उन्हापासून बचाव करण्यासाठी काळजी घ्यावी लागत आहे.
कराड तालुक्यातील विंग येथील कणसेमळा परिसरात तोडणीला आलेल्या उभ्या ऊसाला भीषण आग लागली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आगीने काही क्षणांत रौद्ररूप धारण करत तीन एकरांवरील ऊस जळून खाक झाला. गौरीशंकर कल्याणी यांच्या शेतातील ऊसाला आग लागली असून, शेजारी घरे व जनावरांच्या शेड असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. शेतकरी व तरुणांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात सुका गांजा पॅकेटमध्ये भरून विक्री होत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ५० रुपयांपासून २०० ते ५०० रुपयांपर्यंत गांजाची पॅकेट विकली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. जिल्ह्यातील शहादा, धडगाव, तळोदा, नवापूर आणि अक्कलकुवा परिसरात गांजाची अवैध विक्री होत असल्याचे आरोप केले जात आहेत.
धाराशिव जिल्ह्यात पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून पंचनाम्यात 100 टक्के बाधित क्षेत्र दाखवावे, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली. ऊस, फळबागा, भाजीपाला आणि फुलशेतीचेही 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला.
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क 100 टक्के माफ करावे, अशी मागणीही पाटील यांनी केली.
उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावे. स्वतःचे अपयश लपवण्यासाठी निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचे काम उद्धव ठाकरे करत असल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला. या प्रवृत्तीचा आपण धिक्कार करत असल्याचेही कदम यांनी म्हटले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाकरे बंधू आंदोलन करत आहेत. या आंदोलनात किती पक्ष सहभागी होणार, हे पाहणे महत्त्वाचे असल्याचे रामदास कदम यांनी म्हटले. काँग्रेसचे अधिक खासदार निवडून आले, तेव्हा ज्ञानेश कुमार यांनी गडबड केली नाही, असे उद्धव ठाकरेंना वाटते का, असा सवालही त्यांनी केला.
पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांची तीन वेगवेगळी आंदोलने सुरू झाली आहेत. अलका चौक, शास्त्री रोड आणि एस. एम. जोशी पुलावर विद्यार्थ्यांकडून स्वतंत्रपणे आंदोलन करण्यात येत आहे. वेगवेगळ्या मागण्यांसाठी एमपीएससी विद्यार्थी वेगवेगळे आंदोलन करत आहेत.
सरकारने मेन्सचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न पुढेही कायम ठेवावा, या मागणीसाठी सध्या अलका चौकात आंदोलन सुरू आहे.
बीडच्या परळी शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. शहरातील पेठ मोहल्ला भागात आज तीन लहान मुलांसह महिलेला कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, मागील आठवड्यात जवळपास ९५ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. विशेषतः लहान मुलांना कुत्र्यांचा धोका वाढल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रकची डंपर आणि दोन दुचाकींना धडक
या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून, अन्य जखमींना उपचारासाठी मुळशी तसेच सिम्बायोसिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे..
मिळालेल्या माहिती नुसार सकाळी साडे आठच्या सुमारास ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रक अनियंत्रित झाला आणि त्याने डंपर तसेच दोन दुचाकींना धडक देत उताराने भरधाव वेगात खाली आल्याने हा भीषण अपघात झाला..
अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासनासह संबंधित सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल होतं मदत आणि बचावकार्य केले..
देशातील मतदार याद्यांमध्ये करण्यात आल्याचा आरोप असलेल्या घोटाळ्याच्या मुद्द्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तडकाफडकी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने कोल्हापुरातील बिंदू चौक परिसरात आंदोलन करण्यात आले.
वसई विधानसभा नालासोपारा विधानसभा तसेच पालघर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर हेमंत सावरा हे विरारच्या क्रीडा संकुलच्या उद्घाटन प्रसंगी आले आहेत
मात्र बहुजन विकास आघाडी कडून देखील याच क्रीडा संकुलनाच्या इमारतीचे उद्घाटन केले जाणार आहे
त्या अगोदरच भाजपच्या नेत्यांनी क्रीडा संकुलाचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला जात आहे
आगामी पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेकडून उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रताप उर्फ भैय्या माने यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
भैय्या माने यांनी पदवीधर मतदारांच्या नोंदणीसाठीही आक्रमकपणे प्रयत्न सुरू केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र महायुतीमध्ये अद्याप उमेदवारीचा अंतिम निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर आपण कोणत्याही परिस्थितीत पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवणार, अशी भूमिका भैय्या माने यांनी स्पष्ट केली आहे. उमेदवारी मिळाली नाही म्हणून माघार घेण्यापेक्षा स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
भाई गिरकर यांनी अभिजीत दिपकेंचा निषेध करत, तुम्ही नेहरूंचा पाहिजे तितका उदो-उदो करा, पण बाबासाहेबांचे अवमूल्यन करू नका, असे म्हटले. मुंबईकरांचे धन्यवाद देत मुंबईकरांनी त्यांना नाकारले, बाहेरचे लोक आले होते, त्यांना प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत, असे त्यांनी सांगितले. मुंबईकरांनी आणि शिवाजी पार्कच्या जनतेने त्यांना नाकारले, असेही ते म्हणाले.
नेहरूंना पंतप्रधान करण्यासाठी पहिली मतचोरी झाली. एकही मत नसताना नेहरूंना गांधींनी आपल्या माथ्यावर थोपले. दुसरी मतचोरी त्यानंतर झाली. बाबासाहेबांना पाडण्यासाठी नेहरू प्रचाराला आले, पैसा नेहरूंनी पुरवला, हा दुसरा मतचोरीचा प्रयत्न काँग्रेसने केला, असा आरोप भाई गिरकर यांनी केला.
४ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘गर्जना’ मोर्चासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने १५० जणांचे विशेष स्क्वाड तैनात करण्यात येणार आहे. मोर्चादरम्यान हुल्लडबाजी किंवा गोंधळ घालणाऱ्या तरुणांमुळे मोर्चाला गालबोट लागू नये, यासाठी हे स्क्वाड कार्यरत राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मोर्चाच्या मुख्य मुद्द्याला गालबोट लावण्याचा किंवा अनुचित प्रकार करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास मनसेच्या कार्यकर्त्यांकडून त्याला आळा घालण्यात येणार असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी या मोर्चाचे आवाहन केले आहे. या मोर्चाला विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनीही पाठिंबा दिला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण परिसरातील प्रस्तावित एआय डेटा सेंटरला विरोध वाढू लागला आहे.
माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज शरद पवार यांची भेट घेऊन एआय डेटा सेंटर मुळे होणार्या परिणामाची माहिती देऊन डेटा सेंटर रद्द करावा अशी मागणी केली.
उजनी धरण परिसरातील सुमारे सहाशे हेक्टर क्षेत्रावर एआय डेटा सेंटर उभारले जाणार आहे. याची तयारी सुरू झाली आहे. सेंटरला शेतकर्यांचा विरोध आहे. या पार्श्वभूमीवर आज खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेऊन या प्रकल्पाला विरोध केला आहे.
परवानगी नसताना आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
CJPच्या आंदोलकांसह नेते अभिजीत दिपके यांच्यावरही गुन्हा
आंदोलनासाठी पोलिसांची परवानगी घेतली नसल्याचा आरोप
दादर आणि शिवाजी पार्क पोलिसांकडून कारवाईचा बडगा
संबंधित आंदोलकांविरोधात पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली
धुळे जिल्ह्यामध्ये दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे, कारण पावसाळ्यामध्ये सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे खरीप हंगाम पूर्णतः हातातून गेला आहे, पाऊसच पडला नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्या देखत पिकं करपू लागल्याने शेतकरी पूर्णतः हताश झाला असून, मायबाप सरकारने फक्त घोषणांचा पाऊस न पडता प्रत्यक्षात शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत थेट खात्यात जमा करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे
जानेवारीपासून मोठे फेरबदल दिसणार
महाराष्ट्रात लोकशाहीची पायाभरणी करा
सरकारमधील अनेक पक्ष दूर होण्याच्या प्रयत्नात
भाजप विधानपरिषद उमेदवारांची यादी आजच जाहीर होण्याची शक्यता
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेणार
- नागपुरातील धक्कादायक प्रकार, शाळकरी मुलीला निर्जन ठिकाणी नेऊन अत्याचार करण्याचा प्रयत्न
- पिडीत मुलगी १३ वर्षांची असून, एका शाळेत शिकते
- कथित प्रेमाच्या नावाखाली शाळकरी मुलीला जबरदस्तीने गाडीवर बसवून दोघांनी तिला निर्जन ठिकाणी नेले
पुण्यात कोंढवा कौसरबागेतील रस्ता अतिक्रमणमुक्त
तीस हजार चौरस मीटर जागा मोकळी
कोंढव्यातील कौसरबाग येथील अतिक्रमणे हटविण्यात आली
हिंगोली जिल्ह्याला पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे बसले आहेत
हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील गढाळा परिसरात आज सकाळी सात वाजून 46 मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे
शिक्षक पदवीधर निवडणुकीचे उमेदवारीवरून महाविकास आघाडीत नाराजी
काँग्रेसने जाहीर केले अमरावती आणि पुणे शिक्षक तर नागपूर पदवीधरचे उमेदवार
काँग्रेसने परस्पर उमेदवार जाहीर केल्यानं ठाकरेसेना नारा
शरद पवार यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस.
बारामती आणि दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करणार पाहणी.
शरद पवार यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात खासदार सुप्रिया सुळे असणार सहभागी...
धाराशिवमध्ये नवरात्र-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर FDA ॲक्शन मोडमध्ये; मिठाई विक्रेत्यांची तपासणी सुरू
कळंब तालुक्यातील येरमाळ्यात FDA चा छापा 325 किलो खवा जप्त; 74 हजार 750 रुपयांचा साठा ताब्यात
दुष्काळाची झळ तुळजापूरातील प्रसिद्ध असलेला अडातील गणपती मंदीरालाही
पावसाळ्यात गणपती मुर्ती असते पाण्यात माञ यंदा पाऊस नसल्याने मंदीरालाही बसला फटका
१०० ते सव्वाशे फुट खोल असलेल्या अडातील गणपती मंदिर चार महीने असते पाण्याखाली
विहिरी बोअरवेल खोदण्यास बंदी,यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांचे निर्बंध
खाजगी, व्यावसायिक उपशावरीही मनाई
दुष्काळाची दाहकता, हिंस्र वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती
किनवटच्या अंबाडी जंगलात दिसला बिबट्या , शेतकऱ्याने जीवघेणा धाडस करून केला व्हिडिओ अशा कृत्याचा आम्ही समर्थन करत नाही
अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसने अदिती पोहरे यांना उमेदवारी मिळालीये.
उमेदवारी जाहीर होताच आदिती पोहरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
दरम्यान, उमेदवारीची संधी दिल्याबद्दल त्यांनी पक्षश्रेष्ठी आणि प्रांताध्यक्षांचे आभार मानले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.