अमेरिका आणि इराणची पाकिस्तानातील चर्चा अपयशी ठरल्यानंतर होर्मुझवरुन मोठा तणाव निर्माण झालाय... अमेरिकेनं होर्मुझ जलमार्गावर डिस्ट्रॉयर तैनात केलेत..त्यामुळे इराणही इरेला पेटलाय.. इराणनेही आता जगाची नाकेबंदी केलीय.... एवढंच नाही तर युद्ध थांबत नाही तोपर्यंत होर्मुझ बंदच ठेवण्याचा इशारा इराणने दिलाय...
एवढंच नाही तर गालिबाफ यांनी अमेरिका आणि इराण चर्चेपासून खूप दूर असल्याचंही स्पष्ट केलंय.. तर दुसरीकडे इराणने होर्मुझ खुली केली नाही तर अमेरिका इराणवर बॉम्बवर्षाव करेल अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलीय...
आधीच अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी झालीय... त्यानंतर इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांनी चर्चाही केली.. या चर्चेत होर्मुझवर नियंत्रण सोडण्यास इराण तयार नसल्यानं चर्चा फिस्कटली... त्याच दरम्यान इस्रायल लेबनॉनमध्ये अक्षरशः धुमाकूळ घालत होता... अजूनही हे हल्ले सुरुच आहेत... आता शस्त्रसंधीची वेळ संपत आली असतानाच इराण आणि अमेरिका दोन्ही देश एकमेकांना इशारे देत आहेत.. त्यामुळे हे युद्ध आता थांबणार की शस्त्रसंधी धुडकावून पुन्हा युद्धाचा भडका उडणार? याकडे जगाचं लक्ष लागलंय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.