नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता विधानपरिषद आणि राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी (Presidential Elections) भाजपसह महाविकास आघाडीच्या नेत्यांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. विधानपरिषदेची निवडणूक येत्या २० जूनला होणार आहे.मात्र अत्यंत उत्कंठावर्धक आणि देशातील प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी भाजपसह (BJP) विरोधीपक्षांनी मोट बांधायला सुरुवात केलीय. (President Election 2022 News Updates)
दरम्यान,मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajeev Kumar) यांनी नुकतीच राष्ट्रपती निवडणुकीच्या तारखेची घोषणा केलीय. राष्ट्रपतिपदासाठी १८ जुलै रोजी मतदान होणार असून २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. तर २९ जून रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असेल. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रपतिपदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपती आणि उप राष्ट्रपती निवडणूक अधिनियम १९५२ च्या कलम ४ (१) अन्वये राष्ट्रपती निवडणूक २०२२ संदर्भातील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. नानिर्देशन पत्रे सादर करण्यासाठी बुधवार, २९ जून २०२२ ही तारीख अंतिम असणार आहे. तर या नानिर्देशन पत्रांची छाननी करण्यासाठी गुरुवार, ३० जून २०२२ ही दिनांक निश्चित करण्यात आली आहे. तसेच शनिवार, २ जुलै २०२२ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.
Edited By - Naresh Shende
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.