Mumbai Corona Update: सतर्क राहा! कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ; ताजी आकडेवारी पाहा

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने मुंबईकरांचे टेन्शनही वाढवले आहे.
Mumbai corona update
Mumbai corona updateSaam Tv
Published On

मुंबई: कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने (corona new patients) मुंबईकरांचे टेन्शनही वाढवले आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येने (Mumbai corona update) दोन हजारांचा टप्पा पार केला. त्यामुळे मुंबईकरांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

Mumbai corona update
नुपूर शर्मा यांच्या अडचणी वाढल्या ; बीडमध्ये गुन्हा दाखल

मुंबई महापालिकेने (BMC) आज, बुधवारी कोरोनाचा दैनंदिन अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार, मुंबई महापालिका क्षेत्रांत गेल्या २४ तासांत २ हजार २९३ नवीन कोरोनाबाधितांचे निदान झाले आहे. तर एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत ८४ कोरोनाबाधितांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी ११ रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती आहे. मुंबईत सध्याच्या घडीला एकूण १२ हजार ३४१ सक्रिय रुग्ण आहेत.

Mumbai corona update
आदित्य कोंडमूरची गिनीज बुकात उत्तुंग झेप, कमी वयात 'कार्ड थ्रोईंग'चा विक्रम करणारा पहिला भारतीय

महाराष्ट्रात सक्रिय रुग्णांची संख्या १९ हजारांवर

महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढ वेगाने होत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने आज, बुधवारी कोरोनाचा दैनंदिन अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार, राज्यात गेल्या २४ तासांत ४०२४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांचा आकडा १९२६१ वर पोहोचला आहे.

राज्यात ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरियंटचे आणखी ४ रुग्ण

महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या सबव्हेरियंट BA.5 बाधित आणखी चार रुग्ण आढळले आहेत. पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती देण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, या नवीन व्हेरियंटचा संसर्ग झालेल्या या सर्व महिला रुग्ण आहेत. त्यांचे वय साधारण १९ ते ३६ आहे. त्या सर्व महिला रुग्ण मुंबई, पुणे, नवी मुंबई आणि ठाण्यातील आहेत. २६ मे ते ९ जून २०२२ या दरम्यान या सर्व रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांची प्रकृती स्थिर होती, अशीही माहिती देण्यात आली.

Edited By - Nandkumar Joshi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com