Mamata Banerjee Opposition Meeting in Delhi Latest Update SAAM TV
देश विदेश

Presidential Election 2022: विरोधकांच्या एकजुटीआधीच ममता बॅनर्जींच्या प्रयत्नांना मोठा झटका

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीआधी ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे.

साम ब्युरो

नवी दिल्ली: राष्ट्रपतिपदासाठी पुढील महिन्यात निवडणूक होत आहे. (Presidential Election 2022) या निवडणुकीआधी विरोधी पक्षांची एकजूट करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आज, बुधवारी दुपारी महत्वाची बैठक बोलावली आहे. मात्र, या बैठकीआधीच ममता बॅनर्जींच्या प्रयत्नांना सुरुंग लागल्याचे चित्र आहे.

आम आदमी पक्ष (AAP) आणि तेलंगणा राष्ट्रीय समिती (TRS) यांसारख्या पक्षांनी या बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसंदर्भात १५ जून रोजी विरोधी पक्षांची एक बैठक बोलावली आहे.

ममता बॅनर्जींनी या बैठकीची निमंत्रण पत्रिका तयार केली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सीपीआयएमचे नेते सीताराम येचुरी यांच्यासह विरोधी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना निमंत्रण दिले आहे. मात्र, आता काही पक्षांनी या बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला आहे, अशी माहिती समजते.

शिवसेनेकडून सुभाष देसाई जाणार

राष्ट्रपतिपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये शिवसेना सहभागी होणार आहे. तसे शिवसेनेकडून कळवण्यात आले आहे. शिवसेनेच्या वतीने उद्योगमंत्री सुभाष देसाई या बैठकीत सहभागी होणार आहेत. नवी दिल्ली येथे दुपारी तीनच्या सुमारास कॉन्स्टिट्युशन क्लब येथे ही बैठक होणार आहे. यासाठी शिवसेनेचे (Shivsena) प्रतिनिधी म्हणून देसाई नवी दिल्लीला रवाना झाले आहेत.

या बैठकीत सहभागी होणारे पक्ष

या बैठकीत काँग्रेस, डीएमके, शिवसेना, समाजवादी पक्ष, आरएलडी, राष्ट्रवादी काँग्रेस, पीडीपी, नॅशनल कान्फरन्स, जेडीएस, सीपीएम, सीपीआय आदी पक्ष सहभागी होणार आहेत.

कोणते पक्ष सहभागी होणार नाहीत?

ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या बैठकीला आम आदमी पक्ष, टीआरएस, बीजेडी, अकाली दल हे पक्ष उपस्थित राहणार नाहीत. आरजेडीबाबतचा निर्णय अद्याप कळू शकलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

SCROLL FOR NEXT