मुंबई : शरद पवारसाहेब (Sharad Pawar) यांचे नाव राष्ट्रपती पदासाठी सगळे सुचवत आहेत, पवारसाहेब राष्ट्रपती झाले तर आमचा उर भरून येईल. संख्याबळ जुळणे गरजेचे आहे. पवारसाहेब आत्तापर्यंत कोणतीही निवडणूक हरले नाहीत, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलं आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्यसभेची निवडणूक (Rajya Sabha Election) पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष विधान परिषद आणि राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकडे लागले आहे. राज्यात प्रत्येक निवडणुकीत एकमेकांचे प्रतिस्पर्थी असणारे महाविकास आघाडी विरुद्ध भाजप हा फार्म्युला जसा राज्यात आहे, तसाच देश पातळीवर आता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपविरोधी (BJP) पक्षांनी मोट बांधायला सुरुवात केली आहे. त्यासाठीच आता सत्ताधारी भाजप आणि विरोधकांनी या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.
हे देखील पाहा -
पुढील महिन्यात १८ जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांकडून शरद पवार यांचे नाव समोर येत आहे. तसंच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शरद पवारांचे नाव समोर येत असेल तर आमचा त्यांना पाठिंबा असेल असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलं आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर पत्रकारांनी आज मंत्री छगन भुजबळ यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, 'शरद पवारसाहेब यांचे नाव राष्ट्रपती पदासाठी सगळे सुचवत आहेत. पवारसाहेब राष्ट्रपती झाले तर आमचा उर भरून येईल. संख्याबळ जुळणं गरजेचे आहे. शरद पवारसाहेब आत्तापर्यंत कोणतीही निवडणूक हरले नाहीत. जरी ते राष्ट्रपती झाले तर एका जागेवर बसण्याचा त्यांचा स्वभाव नाही. शरद पवार यांना राष्ट्रपती होणे कितपत आवडेल हे मला माहित नाही.
तसंच २०२४ ला सगळे पक्ष एकत्र आले तर पवार साहेब नेतृत्व करतील.कोणी पायात पाय घातला तर नाराजी दूर करण्यात शरद पवार यांचा वेळ जाईल असंही भुजबळ म्हणाले. आपल्या पक्षाचे आमदार पक्ष सोडून इतर आमदार बांधील नसतात. संशयावरून त्यांना दुखावले तर पुढील निवडणूक कठीण होईल अशी भिती देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.
तर विधान परिषदेत महाविकास आघाडीला विजय मिळावा यासाठी आता सगळ्यांनी एकत्रित राहिलं पाहिजे. महाविकास आघाडीतील नेते याची काळजी घेतील. तसंच विधान परिषदेत सगळ्यांनी काँगेसला मदत करावी, सावधानता बाळगत आमचे सहा उमेदवार आम्ही निवडून आणू असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.